27.5 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeRatnagiriमोटारीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी

मोटारीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी

या प्रकरणी योगेश मगर यांनी खेत्री यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.

महामार्गावर सतत होणारे अपघात चिंतेची बाब ठरत आहे. हातखंबा उतारावर तर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका घडत आहे. त्यामुळे अनेकदा वाहनांच्या अपघातांच्या घटनेमुळे जीवितहानी तर होतेच सोबत वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक वेळा वाहतुकीच्या नियमांचे देखील तीन तेरा चालक वाजवतात. आणि त्यामुळे विशेष करून अपघाताच्या घटना घडतात.

हातखंबा ते रत्नागिरी रस्त्यावर मोटारीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये स्वार जखमी झाला. ग्रामीण पोलिसात संशयित मोटारचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जगदीश भागण्या खेत्री रा. आदर्शनगर साईमंदिर जवळ, कारवांचीवाडी, रत्नागिरी असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर घडली. त्यामुळे अपघातग्रस्त स्वाराला चांगलाच मार बसला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश फुलचंद मगर वय २८, रा. पाली. बॅंक ऑफ इंडियाजवळ शरद राऊत यांच्या घरी भाड्याने, रत्नागिरी. मुळः उस्मानाबाद हे दुचाकी एमएच-४२-डब्ल्यू-९०६३ घेऊन पाली ते रत्नागिरी येत असताना पाठीमागून येणाऱ्या मोटारवरील एमएच-०१-एआर- ७९४८ चालक संशयित खेत्री यांनी दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वार जखमी झाला तर दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी योगेश मगर यांनी खेत्री यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. झालेल्या अपघाताच्या घटनेमध्ये दोन्ही वाहन आणि चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पोलीस तक्रारीवरून कळून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular