28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeDapoliनववर्ष स्वागतासाठी दापोली हाउसफुल्ल...

नववर्ष स्वागतासाठी दापोली हाउसफुल्ल…

४ ते ५ तारखेपर्यंत रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे

नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी दापोली तालुक्यातील किनाऱ्यांना पसंती दिली आहे. ऑक्टोबरपासून बुकिंग केले असल्याने तालुक्याची सर्वच किनारपट्टीला पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढली असून, सुमारे एक लाख पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावली. दापोली तालुक्यातील मुरूड हे पर्यटकांचे जरी आकर्षण असले तरी सध्या सर्वच किनाऱ्यांवर पर्यटकांची चलती दिसू लागली आहे. सलग लागलेल्या सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावले दापोली किनाऱ्यावर वळत आहेत. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुरूड येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. किनाऱ्यावरील बहुतेक हॉटेल, रिसॉर्ट, घरगुती खानावळी, एमटीडीसी मान्यताप्राप्त न्याहरी आणि निवासाच्या सोयी हाउसफुल्ल झाल्या आहेत. यामुळे पोलिसांवर ताण पडला आहे. आसूद आणि सालदुरे, कर्देमार्गे मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठीच्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

हर्णे, पाळंदे, कर्दे, लाडघर आदी ठिकाणी कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच मध्य प्रदेश, गुजरातसारख्या इतर राज्यातील पर्यटक हजेरी लावत आहेत. दापोली मुख्य शहर तसेच सर्व किनारपट्टीला जाणाऱ्या रस्त्यांवर पर्यटकांच्या वाहनांची गर्दीच गर्दी होत आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी ठेवली आहे. दापोलीसह मुरूड, कर्दे, पाळंदे, आंजर्ले, पाडले, केळशी आदी समुद्रकिनाऱ्यावरील गावातील हॉटेल, कॉटेज, लॉजचे ५ जानेवारीपर्यंत आरक्षण फुल्ल झाले आहे.

आजपासून रेकॉर्ड ब्रेक गर्दी – पूर्वनियोजित बुकिंग केल्यामुळे किनारपट्टीला अजून ४ ते ५ तारखेपर्यंत रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे, असे कर्दे गावचे सरपंच व सन ब्लिस रिसॉर्टचे मालक सचिन तोडणकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular