23 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeDapoliअवैधरित्या बंदूक बाळगल्याप्रकरणी एकाला पोलीस कोठडी

अवैधरित्या बंदूक बाळगल्याप्रकरणी एकाला पोलीस कोठडी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या विविध प्रकारचे गुन्हे घडत असल्याचे नजरेस येत आहे. गुन्ह्यांची पाळेमुळे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी विविध वन्य जीवांच्या अवयवांची तस्करी, तर काही ठिकाणी चोरी करणे, दरोडा घालणे, अवैधरीत्या बॉम्ब तयार करणे, शस्त्र बाळगणे, असे विविध गुन्ह्यांखाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारांना योग्य वेळी अटक करण्यात आले आहे.

दापोली येथे अवैधरित्या बंदूक बाळगल्याच्या आरोपावरून विनेश विश्राम बर्जे, याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडील सिंगल बॅरेल असलेल्या ०२ अवैध बंदुका देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथे ही घटना घडली असून त्याच ठिकाणी कारवाई देखील करण्यात आली आहे.

खेर्डी, पानवाडी, ता. दापोली येथे इसम विनेश विश्राम बर्जे, वय ४० वर्षे, रा. खेर्डी, पानवाडी हा त्याचे घराचे शेजारी बंदुकीची साफसफाई करताना मिळून आला. त्याचे ताब्यात सिंगल बॅरेल असलेल्या ०२ अवैध बंदुका मिळून आल्या. कोणतेही शस्त्र मग ते स्वसंरक्षणासाठी असो किंवा, इतर वापरासाठी. त्यासाठी शासनाचा शस्त्र परवाना असणे गरजेचे आहे.  सदर दोन्ही बंदुकांची किंमत सुमारे रु. ५०,००० /- आहे. सदर बाबत पोह. विजय आंबेकर, नेमणुक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सपोफौ रविंद्र बुरटे नेमणुक दापोली पोलीस ठाणे हे करीत आहेत असून, सदर कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोउनि संदीप वांगणेकर, पो. हवालदार मिलींद कदम, विजय आंबेकर, बाळु पालकर आणि चापोना दत्ताराम कांबळे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular