27.5 C
Ratnagiri
Tuesday, December 3, 2024

एकनाथ शिंदेंनी भाजपची झोप उडविली सरकारला बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव?

मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी...

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत...

‘कोरे’चे विलीनीकरण झाल्यास गुंतवणूक सुलभ – अॅड. विलास पाटणे

कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर रेल्वे मंत्रालयाने...
HomeDapoliमहिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने येथील आमदार महिला मतदारच ठरवणार आहेत.

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे तसेच सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन दापोली प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे. मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा ११ हजार ५२५ ने अधिक असल्याने येथील आमदार महिला मतदारच ठरवणार आहेत. सध्या लाडकी बहीण योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचल्याने आणि त्याची घसघशीत रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाल्याने या महिला कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकतात यावर निकाल अवलंबून आहे.

दापोली विधानसभा मतदार संघात तीन तालुक्याचा समावेश असून, एकूण ३९२ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी मंडणगड तालुक्यामध्ये ७४, दापोली तालुक्यामध्ये २१२’ आणि खेड तालुक्यांमध्ये १०६ मतदान केंद्रे आहेत. मतदार संघांमध्ये एकूण दोन लाख ८६ हजार ९८३ मतदार आहेत. त्यामध्ये एक लाख ३७ हजार ७७४ पुरुष आणि एक लाख ४९ हजार २९९ महिला मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या १५६० आहे तर ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ३ हजार ६६८ एवढी आहे. या निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदार आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.

निवडणूक कामकाजाकरिता ६० क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी एकूण भरारी पथकाच्या १८ टीम आणि ७ स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी पथक यांना मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी ६० बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदारासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular