25.6 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeDapoliदापोली नगरपंचायतीच्या घोटाळ्यात अनेक गोष्टी होतायत उघड

दापोली नगरपंचायतीच्या घोटाळ्यात अनेक गोष्टी होतायत उघड

या एवढ्या कोटयावधीच्या घोटाळया मागे नेमका कोणाचा वरद हस्त आहे? याचीही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दापोली नगरपंचायती मधील कोट्यावधी रुपयांच्या झालेल्या घोटाळ्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पण आता काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या ट्रिपची चर्चा रंगली आहे. हे ट्रिपचे रिटर्न गिफ्ट कोणाकडून घेण्यात आले होते याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. फार्म हाऊस वर पार्ट्या कोणी केल्या? असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

स्वतःला बडा समजणारा व दुसरा प्रशासन अभ्यास आपल्यालाच कळत या आविर्भावात वावरणारा पदाधिकारी हे दोघेही या ट्रीपचे प्रमुख असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. फ्लाईट बुकिंगपासुन सगळे बुकिंग कोणी केले? त्यासोबतच कोणाला मोबाईल गिफ्ट दिला? या सगळ्या चर्चा आता बाहेर पडू लागल्या आहेत. आणि या एवढ्या कोटयावधीच्या घोटाळया मागे नेमका कोणाचा वरद हस्त आहे? याचीही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

कोणत्या कर्मचाऱ्याने या ट्रिपचे बुकिंग करून दिले? किती पैसे भरले? कोणत्या खात्यातून हे पैसे ट्रिपचे बुकिंग करण्यासाठी वापरण्यात आले? या ट्रिपमध्ये नक्की कोणते पदाधिकारी होते?असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ही ट्रिपचे रिर्टन गिफ्ट म्हणून कोणत्या पदाधिकारी देण्यात आल्याने ते खालल्या मिठाला जागले अथवा नाही? याचीच चर्चा सध्या रंगली आहे.

या ट्रिपला कोणते पदाधिकारी होते कोणाची आपल्या मुलांसहित या ट्रिपला गेले होते याचीच चर्चा सध्या रंगू लागली आहे. या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील अनेक मित्र मंडळीना देखील प्रवास घडविल्याचे कळत आहे. या सगळ्याची चौकशी होण्यासाठी काहीजण तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या सगळ्या ट्रिप प्रकरणाचीही चौकशी करावी आशी मागणी आता होऊ लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular