27.8 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

एलआयसी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

रत्नागिरीतील एलआयसी कार्यालयाबाहेर एलआयसी विमा प्रतिनिधी आणि...

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...
HomeDapoliआता घर फुटले, काही राहिले नाही म्हणून घर वाचवायला दापोलीत येता

आता घर फुटले, काही राहिले नाही म्हणून घर वाचवायला दापोलीत येता

भांडूपचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांनी कोणी निविदा भरली नाही तर हा अशोक पाटील निविदा भरून हे रिसॉर्ट पाडून दाखवेल, असा इशारा दापोली येथे दिला आहे.

अनिल परब यांचे मुरूड येथील बहुचर्चित असलेले साई रिसॉर्टचे बांधकाम पडण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पण त्या कोणी भरू नये यासाठी ठेकेदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. भांडूपचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांनी कोणी निविदा भरली नाही तर हा अशोक पाटील निविदा भरून हे रिसॉर्ट पाडून दाखवेल, असा इशारा दापोली येथे दिला आहे.

शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त ते दापोलीत आले होते. ते म्हणाले, कोकणात निसर्ग चक्रीवादळ झाले. हर्णैपासून ते श्रीवर्धनपर्यंत, तेव्हा तुम्हाला दापोली मतदारसंघाची आठवण झाली नाही? तुम्ही तेव्हा पर्यावरणमंत्री होतात ना?  आणि आता घर फुटले, काही राहिले नाही म्हणून घर वाचवायला दापोलीत येता; पण लक्षात ठेवा हा दापोलीकर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही पाटील यांनी दिला. शिवसेनेला फरफटत राष्ट्रवादीबरोबर घेऊन गेलात, खरे गद्दार तुम्हीच आहात. राष्ट्रवादीसोबत जो जो पक्ष गेला, तो संपला आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्ध्वस्त करायला निघालात, असेही पाटील म्हणाले.

मागील पंचवीस वर्षे शिवसेना सत्तेत आहे, परंतु मुंबई महानगर पालिकेत एकाही मराठी माणसाला ठेकेदारी मिळालेली नाही. त्यामुळे आता मुंबईत फक्त १९ ते २० टक्केच मराठी माणसाचे अस्तित्व शिल्लक राहिले आहे. सगळे व्यवहार काय करताय?  ते आम्हालाही माहित आहे आणि कळतात.

केवळ निवडणूका आल्या कि, तुम्हाला मराठी माणूस दिसतोय का? काय अवस्था आहे, आज मराठी माणसाची. प्रत्येक प्रभागातील बचतगटाच्या महिलांकडे शाळा, बालवाड्या अंगणवाड्यांना खाऊ देण्याचे काम होते. आत्ता तुम्ही ठेका बाहेरगावच्या कंपनीला दिल्याने, या महिला बेरोजगार झाल्या आहेत. मुंबईतील बचतगटातील मराठी महिला भगिनीवर आलेली बेरोजगारीची कुऱ्हाड तुम्हाला तेंव्हा दिसल्या नाहीत का, असा थेट सवाल पाटील यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular