25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeDapoliमुलाने एकतर्फी प्रेमामुळे, केली अल्पवयीन मुलीची बदनामी

मुलाने एकतर्फी प्रेमामुळे, केली अल्पवयीन मुलीची बदनामी

एका अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी सांगितले,  मात्र या मुलीने त्यास नकार दिल्याने अनिकेत याने सोशल मिडीयावर या मुलीचा फोटो टाकून त्याखाली अश्लील मजकूर पोस्ट केला

दापोलीमध्ये घडलेल्या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. प्रेम आणि लग्न या अशा नाजूक गोष्टी आहेत कि, जेवढे जपून त्यामध्ये राहू तेवढे चांगले. परंतु, अनेक वेळा एकतर्फी प्रेमामुळे अनेक मुली आणि मुलांना त्याचा चांगलाच फटका बसतो. दापोलीमध्ये असेच एक प्रकरण घडले आहे.

दापोली येथील एका अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास व लग्न करण्यास नकार दिला म्हणून फेसबुकवर या मुलीसंदर्भात अश्लील मजकूर प्रसिद्ध करुन अल्पवयीन मुलीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दापोली पोलिसांनी या संशयिता विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला असून आज गुरुवारी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार २ जानेवारी ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत संशयित अनिकेत रवींद्र ढेपे पाटील वय २४ याने १७ वर्षे ५ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी सांगितले, मात्र या मुलीने त्यास नकार दिल्याने अनिकेत याने सोशल मिडीयावर या मुलीचा फोटो टाकून त्याखाली अश्लील मजकूर पोस्ट केला, यामुळे बदनामी झालेल्या या मुलीने अखेर दापोली पोलीस ठाण्यात संशयित अनिकेत ढेपे पाटील यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दापोली पोलीस ठाण्यात अनिकेत विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार भादवी ३५४, ड ,५०९,५०६ ,पोस्को कलम १२ तसेच आयटी ऍक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular