27.7 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeDapoliकृषी विद्यापीठांच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून, बनवले टपाल तिकीट

कृषी विद्यापीठांच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून, बनवले टपाल तिकीट

दापोलीच्या भारतीय टपाल कार्यालयाने ‘माझा शिक्का’ म्हणजेच माय स्टँप या योजनेंतर्गत विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाचे वर्षाचे लोगो असलेले टपाल तिकीट बनवले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची ५० वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सुवर्ण पालवी कृषी महोत्सव साजरा केला. याचे औचित्य साधून हे तिकीट काढण्यात आले. सुवर्ण महोत्सवी बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्य हस्ते या तिकिटाचे अनावरण करून ते विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

दापोलीच्या भारतीय टपाल कार्यालयाने ‘माझा शिक्का’ म्हणजेच माय स्टँप या योजनेंतर्गत विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाचे वर्षाचे लोगो असलेले टपाल तिकीट बनवले आहे. दापोलीच्या भारतीय टपालखात्याचे अधिकारी डी. आर. बोंगाणे आणि त्यांचे सहकारी यांनी हे टपाल तिकीट बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि विद्यापीठला मोफत उपलब्ध करून दिले आहे.

या वेळी राज्याच्या कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित होते. ग्राहकांची छायाचित्रे आणि संस्थांचे लोगो किंवा कलाद्भती, वारसा वास्तू, प्रसिद्ध पर्यटनस्थळे, ऐतिहासिक शहरे, वन्यजीव, इतर प्राणी आणि पक्षी इत्यादींच्या प्रतिमा छापून पोस्टाचे तिकीट असलेल्या निवडक टेम्पलेट शीटवर हे वैयक्तीकरण साध्य केले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular