28.2 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeDapoliदापोली मुरुड साई रिसॉर्ट प्रकरणी, कदम बंधूंना ईडीकडून बोलावणे

दापोली मुरुड साई रिसॉर्ट प्रकरणी, कदम बंधूंना ईडीकडून बोलावणे

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतर चौकशी करणारे पथक जवळपास सहा ते सात दिवस दापोली खेड परिसरात  तळ ठोकून होते

दापोली मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतर चौकशी करणारे पथक जवळपास सहा ते सात दिवस दापोली खेड परिसरात  तळ ठोकून होते. हे पथक आता पुन्हा मुंबईत गेले आहे. दरम्यान आता भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला अनिल परब यांचा संबंध असल्याचा आरोप असलेल्या साई रिसॉर्ट आणि सी कोंच रिसॉर्टवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

आठवड्यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२२ रोजी राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान या साई रिसॉर्ट जवळ संबंधित केबल व्यवसायिकाला या सगळ्या प्रकरणी सर्व सत्य समोर यावे, म्हणून ईडीच्या मुंबई कार्यालयात आज गुरुवारी चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामध्ये मुंबईतील दोन कदम बंधूंना ईडीकडून बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तुम्ही केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मंत्रलयाला सादर करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. या संबंधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारी २०२२ ला केलेल्या तक्रारीनंतर, कोस्टल झोन नियम मोडल्याचे सांगत राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या कारवाईचा रिपोर्ट मागवण्यात आला आहे. राज्य सरकारने काय कारवाई केली आहे अशी विचारणा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केली आहे

याविषयी आता राज्य सरकारकडे विचारणा झाली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या पत्रावर राज्य सरकार नेमके कोणते उत्तर देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ईडीच्या पथकाने दापोली तालुक्यातून सविस्तर माहिती गोळा केली आहे. आवश्यक कागदपत्रे मुरूड ग्रामपंचायत, दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आदी काही ठिकाणी जाऊन ही माहिती जमा केली आहे. खरेदीखत, ग्रामपंचायत टॅक्स पावत्या, पत्रे आदी कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. हा व्यवहार कोणी केला? मध्यस्थ कोण? कोणाच्या खात्यात किती ट्रांझेक्शन झाले? या सगळ्याची माहिती ईडीने घेतली आहे. यामध्ये दापोलीतील एक जागा एजंटचीही चौकशी होणार असल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular