26.7 C
Ratnagiri
Saturday, August 9, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeDapoliदापोली तालुक्यामधील पालगडमध्ये एसटी बसवर अज्ञात व्यक्तीची दगडफेक

दापोली तालुक्यामधील पालगडमध्ये एसटी बसवर अज्ञात व्यक्तीची दगडफेक

एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप अजूनही सुरु आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजूनही रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात २ महिने होऊन गेले तरी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी आर्थिक तोट्यात गेली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण सोडून, इतर मागण्या मान्य केल्या आहेत. पण तरीही कर्मचारी आपल्या मागणीवरून मागे हटायला तयार नाहीत. अखेर शासन कडक नियम करून निलंबनाची कारवाई सुरु केल्यानंतर काही अंशी कर्मचारी हजर झाले.

मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये चालकाच्या पायाला मार बसला असून, तो जखमी झाला आहे. या दगडफेकीमध्ये बसचे सुद्धा नुकसान झाले आहे. दापोली पोलिस ठाण्यामध्ये अज्ञाता हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली आगारामधील एसटी चालक अनंत दयाळकर हे आपल्या ताब्यातील एसटी क्रमांक एम.एच.१४ बी. टी. १३७१ घेऊन २ जानेवारी रोजी मंडणगडवरून दापोलीकडे येत होते. संध्याकाळी ७.१५वा. च्या सुमारास ते पालगड या ठिकाणी बस आली असता, जोशी बंगल्याच्या पुढे जाताना अज्ञात मोटरसायकलस्वारांनी चालत्या बसवर अंधारातून दगड भिरकावले.

तेव्हा काचेवर दगड लागून बसच्या समोरील काच फुटली तो दगड चालक अनंत दयाळकर यांच्या उजव्या पायाला लागून त्यांना दुखापत झाली. या घटनेमध्ये बसचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दापोली पोलिस ठाण्यात याबाबत अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार मिलिंद चव्हाण करीत आहेत. संपामध्ये सामील न होता कामावर हजर झाल्यावरून कोणीतरी हा हल्ला केला गेला असल्याची चर्चा दापोलीमध्ये रंगली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular