31.5 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

संगमेश्वरातील दिवट्या कुलदीपकाने वयोवृद्ध बापाला ‘सुरा’ दाखवून खंडणी मागितली

पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी...

दांडगा वशीला असलेला कोकरे महाराज पोलीस कोठडीत !

या भगवान कोकरे नावाच्या महाराजाचा लोटे व...

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...
HomeDapoliदापोली तापमान ९.२ अंश, वातावरणात प्रचंड गारठा

दापोली तापमान ९.२ अंश, वातावरणात प्रचंड गारठा

यावर्षी ११ जानेवारी रोजी पारा सर्वात कमी म्हणजेच उणे ९.२ अंशावर आला आहे.

दापोली शहराला मिनी महाबळेश्वर असे संबोधले जाते. हे समुद्रसपाटीपासून २५० मीटर उंचीवर वसलेले शहर आहे. एवढ्या उंचीवर असूनही त्याच्या ७ ते ८ किमीवर समुद्र किनारा लाभलेला आहे. दापोली शहरातील वाढते शहरीकरण व उभी राहत असलेली काँक्रीटची जंगले यामध्येही दापोली आपले संबोधन मिनी महाबळेश्वरपण टिकवून आहे.

दापोलीत पडलेल्या अवकाळी पावसानंतर तालुक्यात आता थंडीची लाट आली आहे. वातावरणात कमालीचा गारवा वाढल्यामुळे सर्दी, ताप,  खोकला आदी आजार जडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी ११ जानेवारी रोजी पारा सर्वात कमी म्हणजेच ९.२ अंशावर आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे हवामान केंद्रावर यावर्षी ११ जानेवारीला ही नोंद झाली आहे. सोमवारी सकाळ पासून चोवीस तासातील ही नोंद केलेली आहे. आठवड्यापूर्वी हे तापमान ११ अंशावर आले होते.

दापोलीत सोमवारी कमाल २७.८ आणि किमान ११.७ अंश सेल्सियस इतके आहे. मागील काही दिवसात वातावरणातील गारवा कमी झालेला, मात्र शनिवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने वातावरणातील संपूर्ण चित्रच बदलून गेले आहे. दापोली शहरात सोमवारी वातावरणात अधिक गारवा वाढल्याने नागरिकांनी सकाळपासूनच गरम वस्त्र परिधान केली होती. थंडगार वातावरणामुळे तालुक्यात आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे.

राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कहर वाढला आहे. मुंबईत तर सोमवारी यंदाच्या हिवाळय़ातील निचांकी तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि परिसरात सध्या रात्री आणि दिवसाही गारवा जाणवत आहे. दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत खूपच घटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular