लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि त्यांच्या सहकलाकारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावरून , शिरूर तालुक्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रीय एकात्मेतला बाधा पोहचवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करुन व महिलांच्या विनयशीलतेला धोका पोहचविणारे वक्तव्य केले आहे. तसेच महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हि तक्रार दाखल केली गेली आहे.
पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकर यांच्या विरोधात कलम ५०९ अन्वये तक्रार दाखल केली आहे. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दल महिलांची माफी मागण्याचे बजावूनही, इतक्या दिवसात महिलांची माफी मागितली नाही, त्यांनी महिलांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने, आणि वरती उद्धटपणे प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी स्वत: पोलिसात तक्रार दिली आहे. कायद्याच्या चौकटीत मला योग्य न्याय मिळेल अशी आशा असल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत या प्रकरणी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या कि, “प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी, कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दाखल केली आहे”.