27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriजिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट, पाच वर्षांतील स्थिती

जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात घट, पाच वर्षांतील स्थिती

२०२४-२५ या वर्षात हजार मुलांमागे ९४४ मुली जन्मल्याचे दिसते.

मागील पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार ३२ मुलगे आणि ३२ हजार १२६ मुली असे मिळून ६६ हजार १५८ मुलांचा जन्म झाला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर हा कमी होत आहे. पाच वर्षांपूर्वी हजार मुलांमागे ९५७ मुली जन्मल्या होत्या, तर २०२४-२५ या वर्षात हजार मुलांमागे ९४४ मुली जन्मल्याचे दिसते. घटणारी आकडेवारी चिंता वाढवणारी ठरणार असून, मुलींचा जन्मदर स्थिर राखण्याचे आव्हान राहणार आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगा हवा, अशी अनेक वर्षांपूर्वीची मानसिकता कुटुंबांमध्ये पाहायला मिळत होती. या मानसिकतेत बदल करण्यासाठी शासनाने बेटी बचाओसारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केले आहेत. शासन-प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून लोकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी अशा प्रचलित म्हणीवरून स्त्रीजन्माचे महत्त्वही विशद केले जात आहे; मात्र गेल्या पाच वर्षांत मुलींचा जन्मदर कमी-अधिक राहत असल्याचे दिसत आहे. पूर्वी एका कुटुंबामध्ये अनेक मुले जन्माला येत होती.

शासनाने संतती नियोजनाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. समाजात झालेले बदल, शिक्षणाचा वाढलेला टक्का, बदलते राहणीमान आदींमुळे कुटुंबे सुशिक्षित झाली आहेत. समाज जडणघडणीत वंशाचा दिवा हवाच ही मानसिकता कमी झालेली आहे. कायद्याद्वारे लिंगनिदान, स्त्री-भ्रूणहत्या करण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनातर्फे माझी भाग्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांसारख्या योजनाही राबवल्या जात आहेत. दरवर्षी जन्माला येणाऱ्या मुलांच्या आकडेवारीचा विचार करता मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्मदर कमी होत आहे. २०२०-२१ मध्ये ८ हजार ४५ मुले तर ७ हजार ७०३ मुली जन्माला आल्या. त्यावर्षी जन्मदर ९५७ होता तर २०२३-२४ मध्ये जन्मदर ९१८ आणि २०२४-२५ मध्ये जन्मदर ९४२ राहिलेला आहे. काही अंशाने जन्मदर कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular