26.2 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriबदलत्या हवामानामुळे कोकणचा राजा संकटात, हापूसच्या उत्पादनात घट

बदलत्या हवामानामुळे कोकणचा राजा संकटात, हापूसच्या उत्पादनात घट

आंब्यावर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.

सततच्या हवामान बदलाचा फटका यंदा हापूस आंब्याला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आधी लांबलेला पाऊस, नंतर उशीरा पडलेली थंडी आणि आता अचानक वाढलेली उष्णता यामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हवामानातील बदलामुळे यंदा हापूस आंबाच्या पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कोकणचा हापूस जगप्रसिद्ध झाला आहे. मात्र मागील ६-७ वर्षे जागतिक हवामान बदलामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, तापमान वृद्धी, गारपीट, थंडीचा असमतोलपणा व वादळासारखी संकटे येत आहेत. यामुळे आंब्यावर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. मोहराने भरलेल्या आंब्याच्या बागा काळ्या पडत आहेत. मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या आक्रमणामुळे साहजिकच आंब्याचे खासकरून हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. आजची स्थिती पाहता उत्पादन ६० टक्के घटून ते अवघ्या ४० टक्क्यांवर आले आहे.

यंदाचा हंगाम निराशाजनक – यंदा मोहोर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. कोकणात २८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते. त्यामुळे मोहोर येण्यास जवळपास एक महिन्याचा विलंब झाला. हंगाम सुरू होताना नोव्हेंबरला थंडी कमी होती. मात्र शेतकऱ्यांच्या सुदैवाने डिसेंबरमध्ये थंडी बऱ्यापैकी सुरू झाली. आंब्याच्या बांगा मोहरू लागल्या होत्या. कोकणातील ७० ते ८० टक्के बागांना मोठ्या प्रमाणात मोहर आला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोहर सुस्थितीत होता. शेतकरी मोहर संवर्धनाकडे चांगल्या प्रतीच्या कीडनाशकांची फवारणी करून लक्ष देत होते. वातावरणातील बदलाच्या संकटावर या वर्षी काही अशी मात करता येईल अशी त्यांना आशा होती. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून चित्र प्रतिकूल बनले.

थंडीचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले असताना देखील कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा बागा काळ्या पडू लागल्या. यातून काही बागा काळ्या न पडता चांगल्या राहिल्या मात्र आलेल्या म ोहराचे संवर्धन न होता त्याचे आंब्यात परिवर्तन होऊ शकले नाही. आणखी विचित्र परिस्थिती म्हणजे अनेक बागांना मोठ्या प्रमाणात पालवी आलेली दिसत आहे. त्यामुळे आपत्तीतून वाचलेल्या पहिल्या मोहराचे वाटाण्यापेक्षा मोठे झालेले आंबे टिकणे मुश्कील झाले आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पालवी आली होती. मात्र ती दुसऱ्या बहरानंतर मार्चमध्ये आली होती. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या बहराच्या मोहराला त्याचा फटका बसला होता. यावर्षी मात्र पहिल्या बहराच्या काही प्रमाणात वाचलेल्या आंब्यासाठी हा फार मोठा अडथळा ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular