शहराच्या महापुरास कारणीभूत असलेला बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. अखेर हा पूल प्रशासनाने शुक्रवारपासून पाडण्यास सुरुवात केली आहे. हा पूल पाडण्यासंदर्भात पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. ‘हा पूल शंभर वर्षांपूर्वी बांधलेला ब्रिटिशकालीन पूल आहे. हा पूल म ातीच्या बंधाऱ्याक्के बांधलेला आहे. त्यामुळे मिलिमीटरच्या पुढे पाऊस पडला की या पुलास पाणी अडते आणि ते संपूर्ण खेर्डी-कळंबस्ते आणि चिपळूण शहरात पसरते आणि पूर येतो. याचा फटका चिपळूणवासीयांना बसला आहे. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवर नवा पूल बांधण्यात आल्यानंतर जुना पूल महापुरास कारणीभूत ठरत असल्याने तो तोडण्यात यावा, अशी म ागणी सामाजिक कार्यकत्यांकडून सुरू झाली होती. यामध्ये माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. मात्र, काही राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे हा पूल पाडण्यास विरोध दर्शवला.
त्यामुळे वाशिष्ठी नदीवरून पूल पाडण्याबाबत अनिश्चितता होती. तरीही माजी नगरसेवक श्री. भोजने यांनी पाठपुरावा सातत्याने सुरूच ठेवला होता. प्रसंगी १५ ऑगस्ट २०२४ रोजी उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. याच अनुषंगाने एमआयटी’ मुंबईच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर पूल पाडणे गरजेचे आहे, असा अहवाल समितीने संबंधित विभागाला आणि महसूल विभागाला दिला. त्यामुळे वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्यासंदर्भातील तांत्रिक अडचण दूर झाली होती. राष्ट्रीय महामार्ग, जलसंपदा विभाग आणि मानेभागाकडून पूल पाडण्यासंद कार्यवाहीदेखील सुरू झाली. पावसाळ्यानंतर पूल पाडण्याचे काम सुरू होईल, असे पत्र महसूल विभागाने माजी नगरसेवक अरुण भोजने यांना देऊन उपोषण करू नये, असे सांगितले होते. यानुसार शुक्रवारपासून बहाद्दरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्याची सुरुवात झाली आहे. हा पूल पाडण्यासाठी १ कोटी २३ लाख ६९ हजार ४३५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हा पूल पाडण्याच्या काम ाला सुरुवात झाल्याने माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्यासह प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. हा पूल पाडल्यामुळे पुराची तीव्रता कमी होणार आहे. पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आहे. शुक्रवारपासून बहाद्दरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्याची सुरुवात झाली आहे. हा पूल पाडण्यासाठी १ कोटी २३ लाख ६९ हजार ४३५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने माजी नगरसेवक अरुण भोजने यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्यासह प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. हा पूल पाडल्यामुळे पुराचीनता कमी होणार आहे. पूल पाडण्याची सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.