23.4 C
Ratnagiri
Monday, February 2, 2026

चिपळूणात काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादीला जोर का झटका

भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास...

मिऱ्या- नागपूर महामार्गाची ‘डेडलाईन’ हुकणार? मे अखेर काम पूर्ण होणे कठीण!

विदर्भ आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या...
HomeRatnagiri'एमबीबीएस' प्रवेशाच्या आमिषाने देवरुखात ३५ लाखांची फसवणूक

‘एमबीबीएस’ प्रवेशाच्या आमिषाने देवरुखात ३५ लाखांची फसवणूक

पुणे येथील विश्वनाथ महादेव धावडे याच्याविरुद्ध देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीच्या ‘एमबीबीएस’ प्रवेशाच्या नावाखाली देवरूख भुवड कॉलनी येथील एका निवृत्त महिलेची तब्बल ३५ लाखांची फसवणूक झाल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पुणे येथील विश्वनाथ महादेव धावडे (वय ४८, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, येवलेवाडी, पुणे) याच्याविरुद्ध देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणिता प्रमोद आगरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता आगरे यांची मुलगी सुरभी हिला पुणे येथील पतंगराव कदम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेऊन देतो, असे विश्वनाथ धावडे याने सांगितले. त्यासाठी प्रणिता प्रमोद आगरे आणि पती प्रमोद आगरे यांच्याकडून मुलीच्या प्रवेशाच्या नावाखाली १८ ऑक्टोबर २०२२ ते २० जून २०२४ या कालावधीत त्याने वेळोवेळी पैसे मागितले.

या कालावधीत टप्प्याटप्प्याने एकूण ३५ लाख रुपये त्यांनी दिले. पहिला आणि शेवटचा व्यवहार देवरूख येथील भुवड कॉलनीमध्ये झाला. दुसरा आणि तिसरा व्यवहार मुंबईतील आगरे याच्या निवासस्थानी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या रकमेपैकी ३२ लाख रुपये प्रणिता आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून रोख स्वरुपात काढून देण्यात आले; मात्र विश्वनाथ धावडे याने प्रवेश करून न देता फसवणूक केली. याप्रकरणी विश्वनाथ महादेव धावडे याच्यावर देवरूख पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular