राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंडणगड येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन तसेच न्यायालयाच्या नविन इमारतीचा कोनशिला समारंभाला ते उपस्थित राहाणार आहेत. उपमुख्य मंत्र्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.१५ वाजता हेलिकॉफ्टरने शिरगांव ता.मंडणगड येथे आगमन व मोटारीने भिंगलोळी, मंडणगड तहसिल कार्यालयाच्या मागे होणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन, सकाळी ११ वाजता परिवार पार्कच्या मागे, बाणकोट रस्ता येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नविन इमारतीचा कोनशिला समारंभ होईल.
११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, मंडणगड येथे आगमन, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नविन इमारतीचा कोनशिला समारंभ यावेळी पार पडेल. दुपारी १ वा. ना. फडणवीस भिंगलोली येथील भाजप कार्यालयाला भेट देतील. त्यानंतर योगेश कदम यांचे निवासस्थानी भेट देतील. त्या नंतर हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे परततील.