29 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeChiplunडेरवण येथील युथ गेम्स महोत्सवात कोकणाची बुद्धीबळ आणि व्हॉलीबॉलमध्ये बाजी

डेरवण येथील युथ गेम्स महोत्सवात कोकणाची बुद्धीबळ आणि व्हॉलीबॉलमध्ये बाजी

मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, गडहिंग्लज आदी ठिकाणाहून आलेल्या  एकूण २३४ खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या स्पर्धा ११, १३, १५, १७ या वयोगटात घेण्यात आल्या.

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात आठव्या डेरवण युथ गेम्स महोत्सवांतर्गत एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलात बॅडमिंटन व बुद्धीबळ स्पर्धा पार पडली. बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईने तर बुद्धीबळमध्ये कोकणने बाजी मारली. बॅडमिंटन विभागात मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, गडहिंग्लज आदी ठिकाणाहून आलेल्या  एकूण २३४ खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या स्पर्धा ११, १३, १५, १७ या वयोगटात घेण्यात आल्या.

या स्पर्धेत ११  वर्षे मुलांच्या गटात सिबताईननरझा सोनजी (पुणे),  अन्वय पांडे (अमरावती),  १३  वर्षे गटात मुंबईचा हर्षित माहीमकर तर कोल्हापूरचा चैतन्य तरे तसेच १५  वर्षे गटात तनय मेहेंदळे (पालघर -विरार),  हर्षित माहीमकर तर १७  वर्षे वयोगटात तेजस शिंदे (पालघर – विरार) व तनय मेहेंदळे यांना अनुक्रमे विजेता व उपविजेता घोषित करण्यात आले.

मुलींच्या ११, १३, १५ वयोगटात अनुक्रमे सागरिका पंडा (पालघर – विरार),  शरयू चौबे (मुंबई), गाथा सूर्यवंशी (रायगड),  प्रिषा शहा (पालघर – विरार), प्रकृती शर्मा (रायगड), गाथा सूर्यवंशी यांना अनुक्रमे विजेते व उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. बुद्धिबळ स्पर्धेत ओम कदम याने (मुंबई) सात गुणांची कमाई करत पहिला क्रमांक तर बाळकृष्ण पेडणेकरने (मुंबई) ६ गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. १५ वर्षांखालील गटात अन्वय गोगटेने (रत्नागिरी) चार गुण मिळवित विजेतेपद पटकावले. नंदिनी शिंदे (कराड) आणि अर्थव पाटील (सांगली) यांनी प्रत्येकी साडेतीन गुणांची कमाई करत दुसरे स्थान मिळविले.

त्याचप्रमाणे, व्हॉलिबॉल स्पर्धेच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात केदारनाथ प्रसन्न (सावर्डे चिपळूण) संघाने देवगाव स्पायकर संघावर विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत पुण्याच्या मिलेनियम नॅशनल स्कूलच्या बी टीमने आपल्याच शाळेच्या ए टीमबरोबर झालेल्या सामन्यात २-१ असा विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले.

लंगडी या देशी खेळाचा स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. १२ वर्षांखालील मुले-मुलींच्या गटात ही स्पर्धा खेळविली जात आहे. पेडणेकर स्कूल, तळवडे आणि गद्रे स्कूल, चिपळूण यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पेडणेकर स्कूलने एक डाव २३ गुणांच्या फरकाने विजय मिळवत स्पर्धा जिंकली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular