25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriनिवेंडीत नदीतील गाळ उपशाने शेतकऱ्यांना दिलासा - नदीची खोली वाढविली

निवेंडीत नदीतील गाळ उपशाने शेतकऱ्यांना दिलासा – नदीची खोली वाढविली

तालुक्यातील निवेंडी, भगवतीनगर येथील नदीत प्रचंड गाळ साचल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आसपासच्या शेत व घरांमध्ये पुराचे पाणी घुसत होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जाणीव फाउंडेशन आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या पुढाकारातून नदीतील गाळ काढण्यात आला. याकरिता लोकसहभागही महत्त्वाचा ठरला. गाळ काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पावसाळ्यात पुराचे पाणी शिवगणवाडी व नमसेलवाडीतील घरांत घुसणार नाही. जाणीव फाउंडेशनने डॉ. निमकर यांच्या मार्गदर्शनातून नदीचा गाळ उपसला आणि निवेंडीतील या नदीने मोकळा श्वास घेतला. या नदीतील गाळ गेली कित्येक वर्ष उपसण्यात आला नव्हता. त्यामुळे जवळील शेतीचे प्रचंड नुकसान होत असे.  नदीजवळील सर्व शेतात आणि घरात पाणी येत असे. या अडचणींना ग्रामस्थांना दरवर्षी सामोरे जावे लागते, ही समस्या अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीचे संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी लक्षात घेऊन त्यांनी जाणीव फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमांतून हा उपक्रम करण्याचे जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांना सुचविले. त्यानंतर त्यांनी नदीची पाहणी केली.

ग्रामपंचायतीचे याकरिता सहकार्य लाभले. सर्व सरकारी परवानग्या घेऊन या नदीचे काम जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, डॉ. चंद्रशेखर निमकर, भगवतीनगर ग्रामपंचायत सरपंच प्रगती प्रमोद भोसले, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन करण्यात आले. पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी जाणीव फाउंडेशनचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आम्ही जाणीवचे नवनवीन उपक्रम पाहतो, असे सांगितले. या वेळी दोन जेसीबी आणि लोकसहभागातून चार दिवस काम पूर्ण करण्यात आले. यादरम्यान जाणीव फाउंडेशनचे अवधूत मुळ्ये, उमेश महामुनी, निवेंडी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शिर्के, तेजल पोमेंडकर, पोलीस पाटील नितीन मायंगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोसले, सीआरपी काजल सावंत, ग्रामस्थ नंदकुमार यादव, शंकर आंबेकर, प्रकाश भोसले, अमेय शिगवण, देवीदास शिगवण, वासुदेव शिगवण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular