“मी रत्नागिरी, संगमेश्वर मतदार संघातून शुक्र. दि. २५ ऑक्टो. रोजी निवडणूक अर्ज दाखल करीत आहे. मी अर्ज दाखल करणार आहे तो घसघशीत १ लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येण्यासाठी! कारण माझ्या मतदार बंधू भगिनींनी तसा निर्धारच केला आहे… माझे मतदार बंधू भगिनी जेव्हा निर्धार करतात तेव्हा तो तडीस नेल्याखेरीज रहात नाहीत” असा जोषपूर्ण आत्मविश्वास रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. ना. उदय सामंत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून शुक्र. दि. २५ रोजी स. ११ वा. आपला निवडणूक अर्ज सादर करतील.
कोकणचे भाग्यविधाते ! – ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी, संगमेश्वर मतदार संघासाठीच नव्हे तर साऱ्या कोकणसाठी केलेले ‘चौफेर’ विकास कार्य ध्यानी घेऊनच त्यांना ‘कोकणचे भाग्यविधाते’ म्हणून संबोधले जाते. त्यांनी सांगितले, “माझ्या मतदार बंधू भगिनींनी निर्धारच केला आहे की यावेळी घसघशीत १ लाखाच्या मताधिक्क्याने मला विजयी करायचे”.
वाढते मताधिक्य ! – ना. उदय सामंत यांना रत्नागिरी, संगमेश्वर मतदार संघातील बंधू भगिनी मतदारांनी तब्बल ४ वेळा विजयी केले. यावेळी ते पाचव्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचे मताधिक्य वाढतच गेले. मतदारांचे भक्कम पाठबळ असल्याने हे शक्य झाले.
जोषपूर्ण आत्मविश्वास ! – याबाबत ना. उदय सामंत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले, “मी ४ वेळा या मतदार संघातून विजयी झालो. येथील माझ्या बांधवांनी १ वेळ, २ वेळ नव्हे तर तब्बल ४ वेळा आम्हाला विजयी केले आणि आता मी पाचव्यांदा निवडणूक लढवित आहे तो देखील १ लाखांच्या मताधिक्क्याने विजयी होण्यासाठी!” असा विलक्षण जोषपूर्ण आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
आकडेवारीच सादर ! – ना. उदय सामंत यांनी यावेळी आकडेवारी सादर केली. त्यांनी सांगितले, “२००४ मध्ये मी ६०४५. मतांनी विजयी झालो, २००९ मध्ये मी ८२७६ मतांनी विजयी झालो. त्यानंतर २०१४ मध्ये मी ३९४२७ इतक्या मताधिक्क्याने विजयी झालो तर २०१९ मध्ये मी तब्बल ८७३३५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी झालो” अशी त्यांनी आकडेवारीच सादर केली.
मतदारांची कृतज्ञता – ना. उदय सामंत जोषात होते. त्यांनी सांगितले, “केवळ शहरातीलच नव्हे तर गावा गावातील माझे मतदार बंधू भगिनी निर्धाराने उभे ठाकले आहेत. त्यांचे जबर पाठबळ हेच माझे ‘बलस्थान’ आहे. त्यांच्या पाठबळाच्या बळावरच मी ४ वेळा निवडून आलो व राज्याच्या उद्योगमंत्री पदापर्यंत वाटचाल केली. हे सर्व गावोगावच्या माझ्या बंधू भगिनी मतदारांच्या पाठबळामुळेच शक्य झाले” अशा विनम्र शब्दात त्यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
बाळासाहेब आदरस्थान ! – ना. उदय सामंत उत्साहाने बोलत होते. ‘त्यांनी सांगितले, “स्व. बाळासाहेब ठाकरे हे माझे ‘दैवत’ होय! याच आपुलकीने मी हातात जपमाळ घेतलेले त्यांचे प्रतिकात्मक शिल्प रत्नागिरीत मध्यवर्ती ठिकाणी मारुती मंदिर येथे उभारले. स्व. बाळासाहेबांबद्दल आमच्या सर्वांच्या मनात अपार आदरभाव वसत आला आहे” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्व. बाळासाहेबांचा आदेश ! – ना. उदय सामंत भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मला सांगितले होते, ‘जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरु नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत!’ स्व. बाळासाहेबांचे हे शब्द माझ्या मनात सदैव संजी घालतात” असे ते भरभरुन बोलत होते.
चौफेर विकासाचा ‘वसा’! – ना. उदय सामंत यांनी सांगितले, “माझ्या रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी आजवर इतिहासात झाले नाही इतके ‘चौफेर’ विकास कार्य घडवायचे असा मी निर्णय म्हणा किंवा ‘वसा’ म्हणा घेतला आहे… त्यापासून मी आता मागे फिरणार नाही!” अशा भावविभोर शब्दात त्यांनी सारे स्पष्ट केले.
प्रथमच ‘चौफेर’ विकास ! – त्यांनी पुढे सांगितले, “स्व. बाळासाहेबांचा आदेश मानून मी माझ्या मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र संघर्ष करीत आहे… या संघर्षातूनच ‘चौफेर’ विकास कार्य मार्गी लागल्याचे व प्रत्यक्ष सुरु असल्याचे पहावयास मिळते… या मतदार संघाच्या इतिहासात कधी नव्हे एवढे प्रचंड ‘चौफेर’ विकास कार्य सुरु आहे” अशा मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा सादर केला..
इतिहासात प्रथमच घडले! – ना. उदय सामंत मुद्देसूद बोलत होते. त्यांनी सांगितले, “माझ्या मतदार बंधू भगिनींचे माझ्यावर अलोट प्रेम असल्याने ‘चौफेर’ विकास कार्यासाठी संघर्ष करताना मला उत्साह येतो रत्नागिरीच्या इतिहासात कधी झाले नाही इतके विकास कार्य सुरु आहे याचे मला विलक्षण समाधान वाटते” अशा विनम्र शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
विजयाचा ‘षटकार ‘ही! – ना. उदय सामंत यांनी जोषपूर्ण शब्दात सांगितले, “मी विजयाचा ‘चौकार’ हाणला असून आता ‘पंचक’ पूर्ण करणार आहे. यावेळी तब्बल १ लाखांच्या मताधिक्क्याने मला विजयी करण्याचा निर्धार माझ्या मतदार बंधू भगिनींनी केला आहे आणि पुढच्या वेळी याच बळावर आम्ही विजयाचा ‘षटकार’ ठोकणार आहोत” अशा शब्दात त्यांनी दमदार आत्मविश्वास व्यक्त केला.