19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeBhaktiपहिली माळ - रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवती

पहिली माळ – रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवती

उत्सव यशस्वी करण्यासाठी ट्रस्टीचे पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मेहनत घेत असून, भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन अध्यक्षांमार्फत करण्यात आले आहे.

आज पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्य शासनाने सर्व धार्मिक क्षेत्रे उघडण्यास परवानगी दिल्याने, भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते सुद्धा भगवंताचरणी लीन होण्यासाठी सकाळच मंदिरामध्ये पोहोचले आहेत.

रत्नागिरीकरांचे आराध्य दैवत असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाची सुद्धा जोरदार सुरूवात झाली आहे. दीड वर्षानंतर मंदिर भाविकांसाठी उघडल्याने, आणि नवरात्रीचे ९ दिवस या किल्ल्याला अक्षरशः जत्रेचे स्वरूप आलेले असते.

कोरोनामुळे मंदिर उघडे पूर्णवेळ न ठेवता, त्यासाठी ठराविक वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्या दर्शनाची वेळ पहाटे ५.३० ते रात्री ११.०० पर्यंत असणार आहे. भगवती देवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात होते. दसऱ्याला मध्यरात्री आराबा आणि देवीचा गोंधळ झाल्यानंतर नवरात्रोत्सवाची सांगता होते

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये विविध ठिकाणाहून अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. देवीच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास उघडे असते. मंदिरात दररोज आरती आणि पूजा असे कार्यक्रम होतात. गाभाऱ्यात एकाच वेळी एका व्यक्तीलाच प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी आणि सायंकाळी होणारी आरती उत्सव काळात रद्द करण्यात आली आहे.

मंदिरानजीक भाविकांसाठी मंडप उभारण्यात आला आहे. खेळणी, मिठाई, आणि हार-फुले विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. प्रत्येक दुकानात सहा फुटांचे अंतर राखण्यात आले आहे. परिसराची संपूर्ण साफसफाई करण्यात आली आहे. रस्त्यांवरील बंद असणाऱ्या पथदीपांची दुरुस्ती करण्यात आली असून, पायवाटेवरही तात्पुरते पथदीप उभारण्यात आले आहेत. रस्त्याशेजारील गवतही कापण्यात आले आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी ट्रस्टीचे पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मेहनत घेत असून, भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन अध्यक्षांमार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular