30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेकडून आर्थिक फसवणूक

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेने शहरातील गोवळकोट...
HomeRatnagiriगणपतीपुळेत माघी उत्सवासाठी ४५ हजार भाविक दाखल

गणपतीपुळेत माघी उत्सवासाठी ४५ हजार भाविक दाखल

किनाऱ्यासह गणपतीपुळेमध्ये भाविकांची रेलचेल होती.

तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे श्री क्षेत्री माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांतील भाविक गणपतीपुळेत दर्शनासाठी दाखल होत आहेत. मागील दोन दिवसांत सुमारे ४५ हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यामुळे किनाऱ्यासह गणपतीपुळेमध्ये भाविकांची रेलचेल होती. माघी गणेशोत्सवाला गणपतीपुळे मंदिरात उत्साहात आरंभ झाला. प्रतिष्ठापनेच्या दिवशी मंगळवार असल्यामुळे अंगारकी योग होता. त्यामुळे भाविकांनी गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. यामध्ये सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील भाविकांचा समावेश होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिकांनीही दर्शनासाठी गणपतीपुळेत हजेरी लावली होती. या उत्सवाला गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून किनाऱ्यांवरील जीवरक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्याकडून किनाऱ्यावर गस्तही घालण्यात येत होती. देवस्थानतर्फे भाविकांना रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी मंडप व्यवस्था केली होती. त्यामुळे दुपारी उन्हाचा त्रास झाला नाही. गेल्या दोन दिवसांत सुमारे ४५ हजार पर्यटकांची मंदिरामध्ये नोंद झाली. माघी गणेशोत्सवासाठी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांनी उपस्थिती लावल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

RELATED ARTICLES

Most Popular