व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. अनेकवेळा सार्वजनिक एसटीमध्ये विकृत प्रकारची माणस आढळून येतात. तर काही वेळेला अशा माणसांमुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अशीच एक घटना रत्नागिरी मध्ये घडली असून, एका मद्यपीमुळे चालक वाहकासह इतर प्रवाशांना नाहक पोलीस स्टेशनची सफर करावी लागली.
घडलेली घटना अशी कि, एसटी महामंडळाच्या रत्नागिरी ते देवरूख जाणाऱ्या एसटीमध्ये एका मद्यपी प्रवाशाने प्रचंड दंगा घातला. यामध्ये एसटीच्या वाहकाला मारहाण केल्यामुळे एसटीच शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली. देवरूख एसटीचे वाहक जयवंत जगन्नाथ मोहिते वय ४० रा. देवरूख आगार हे एसटी चालक एसटी क्र. एमएच-२० बीएल ३६१९ घेवून देवरूखकडे जात असताना शहरातील जयस्तंभ येथे बसमध्ये तोल जावून पडले. त्यावरून मद्यपी व वाहक याच्यात बाचाबाची झाली. बाचाबाची वाढून त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. या बसमध्ये वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते.
वाहकाला मारहाण झाल्यामुळे प्रवाशांसह चालकाने एसटी थेट शहर पोलीस ठाण्यात नेवून उभी केली. वाहकाने शहर पोलीस ठाण्यात या प्रकाराची नोंद केल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास एसटी रहाटाघर येथे नेण्यात आली. मात्र या सर्व प्रकारामध्ये प्रवाशांची चांगलीच हलत बेकार झाली असून, त्यांना दोन तास एसटीमध्ये बसून राहावे लागले होते.
सायंकाळी संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्यावर वाहकाला केलेल्या मारहाण प्रकरणी आणि एसटी बसमध्ये केलेल्या मद्य पिऊन घातलेल्या गोंधळाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

