25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeKokanचिपी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीस डीजीसीएची परवानगी

चिपी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीस डीजीसीएची परवानगी

९ ऑक्टोबर पासून सिंधुदुर्गासह कोकणच्या नवीन विकासाचा श्रीगणेशा होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथे आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा.लि. कंपनीने सुमारे ८०० कोटी रुपये खर्चून विकसित केलेले हे तळकोकणातील पहिले विमानतळ आहे. चिपी विमानतळ सुरु झाल्यानंतर कोकणासाठी नक्कीच पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत.

कोकणच्या चैतन्यात भर घालणाऱ्या मात्र अनेक वर्षांपासून रखडून पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास अखेर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याने या विमानतळावरून आता प्रवासी विमानांचे उड्डाण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डीजीसीएने चिपी विमानतळावरून प्रवासी विमान उड्डाणाला परवानगी दिल्याने, या विमानतळाच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर झाली असून प्रवासी विमान उड्डाणे सुरू करण्याचाही कंपनीलाही काही अडथळे निर्माण होणार नाहीत. आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मिळालेल्या परवान्यामुळे या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. ठरलेल्या सामंजस्य करारानुसार सुमारे ९० वर्षे हे विमानतळ आयआरबी कंपनीच्या ताब्यात राहणार आहे.

कोकण आता मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र,  दक्षिणेकडील राज्ये तसेच देशाच्या अन्य भागांशीही हवाई मार्गाने जोडला गेल्याने पर्यटक प्रवासी तसेच मालवाहतुकीला फायदा होणार आहे. चिपी विमानतळाला प्रवासी वाह्तूकीच्या मान्यतेमुळे हवाई मार्गाने अनेक देशांशी जोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोकणातून परराज्यात, देशांमध्ये नवनवीन उद्योग व्यवसायांचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण चिपी विमानतळाच्या श्रेयावादावरून रंगलेले राजकारण संपुष्टात येऊन अखेर उद्घाटनाची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबर पासून सिंधुदुर्गासह कोकणच्या नवीन विकासाचा श्रीगणेशा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular