29.8 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

भाट्ये समुद्राच्या पाण्यात खेळणे तरूण तरूणीच्या जीवावर बेतले…

मैत्रिणीसोबत भाट्ये समुद्रात खेळण्याचा आनंद लुटताना पॉलिटेक्नीकच्या...

उदय सामंत यांना मंत्रिपदाची संधी, पदाबाबत उत्सुकता

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या...
HomeRatnagiriधामणी आणि आंबेडखुर्द येथे नदीत माती टाकून रस्ता रुंदीकरण, कारवाईची मागणी

धामणी आणि आंबेडखुर्द येथे नदीत माती टाकून रस्ता रुंदीकरण, कारवाईची मागणी

संगमेश्वर नजीक धामणी आणि आंबेडखुर्द येथे चक्क नदीत माती टाकून रस्ता बनवला जात असल्याने धामणी ग्रामपंचायत ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग विभागाला नोटीस देणार आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे संथ गतीने वर्षानुवर्षे सुरु असलेले काम आणि त्यामध्ये सततच्या येणाऱ्या अडचणी त्यामुळे जनता हैराण झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना संगमेश्वर नजीक धामणी आणि आंबेडखुर्द येथे चक्क नदीत माती टाकून रस्ता बनवला जात असल्याने धामणी ग्रामपंचायत ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग विभागाला नोटीस देणार आहे. त्याच बरोबरच धामणीचे माजी सरपंच श्रीनिवास पेंडसे यांनी आपण या बेजबाबदार कामाची तहसीलदार देवरुख यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे.

संगमेश्वर धामणी गावामध्ये एका बाजूला नदी आणि दुसऱ्या बाजूला कोकण रेल्वे मार्गाची हद्द अशी स्थिती रेल्वे उड्डाण पूलाजवळ आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेत एक इंचाचेही अतिक्रमण करायचे नाही, असा सूचक इशारा राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिल्यानंतर देखील सदरच्या ठिकाणी चक्क नदीत माती टाकून पूर्वीचा रस्ता रुंद करण्याचा पोरखेळ सुरु असल्याचे दृश्य समोर आले आहे.

आता याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यासाठी पाया मजबूतीकरीता खोदलेली माती नदीत टाकण्यात आली आहे. नदीत अतिक्रमण करताना आणखी माती देखील टाकली जात असल्याने मेरीटाइम बोर्डासह , पर्यावरण विभाग, तहसीलदार, खनीकर्म विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पहाणी करावी अशी मागणी श्रीनिवास पेंडसे यांनी केली आहे.

तसेच सध्या नदीत उभारण्यात आलेली संरक्षक भिंत तोडून, तेथील नदीमध्ये टाकण्यात आलेली माती कडून नदीचा प्रवाह मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी पेंडसे यांनी केली आहे. आधीच नदीचे पत्र अरुंद आहे आणि त्यात माती टाकून ते अगदीच अरुंद बनले आहे, त्यामुळे गावाला भविष्यात पुराचा सुद्धा धोका उद्भवू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular