27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeMaharashtraकोकण रेल्वे मार्गावर धावणार धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस!

कोकण रेल्वे मार्गावर धावणार धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस!

ठाणे रेल्वे स्टेशनवर कोकणात जाणारे बहुतांश प्रवासी येत असतात, त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे विशेष ट्रेन सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ यांच्यावतीने कोकणात गणेश उत्सव काळात आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ धर्मवीर एक्सप्रेस सोडावी असे निवेदन देण्यात आले होते. कोकणातील प्रवाशांच्या मागणीचा विचार करुन खा. राजन विचारे यांनी याबाबतचे निवेदन रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना दिले. या निवेदनाला कोकण रेल्वे कॉपोरेशन लिमिटेड यांच्या वतीने सकारात्मक उत्तर आल्याची माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली. दरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून ही मागणी करण्यात आली होती. ही मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मांडली. खा. विचारे यांच्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्टेशनवर कोकणात जाणारे बहुतांश प्रवासी येत असतात. ठाणे, मुंबई उपनगरे तसेच मीरा भाईंदर नवी मुंबई सारख्या परिसरातून कोकण प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनात गावी जाण्यासाठी गाडी पकडतात. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे विशेष ट्रेन सुरु करावी अशी मागणी करण्यात आली. गणेशोत्सव काळात कोकण वासियांसाठी ठाण्यावरुन विशेष धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस सुरु करण्यसाठी मध्ये रेल्वेवरुन ०११८५/०११८६ एलटीटी कुडाळ ही अनारक्षित गणपती विशेष गाडीचा विचार सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular