‘खतरों के खिलाडी १२’ प्रमाणे, डीआयडी सुपर मॉम्स सीझन ३ चा देखील २५ सप्टेंबर रोजी ग्रांड फिनाले झाला. ज्यामध्ये वर्षा बुमराहने शोची ट्रॉफी जिंकली आहे. वर्षाला ५ लाख रुपयांच्या बक्षीस रकमेसह एक चमकणारी ट्रॉफी मिळाली. त्याचबरोबर वर्षाला प्रायोजकांकडून अडीच लाखांचा धनादेशही मिळाला. अलीकडेच प्रस्तारीत झालेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की या बक्षिसाच्या रकमेतून तिला तिच्या मुलाला चांगले आयुष्य द्यायचे आहे.
शोमध्ये येण्यापूर्वी वर्षा तिच्या पतीसोबत बांधकाम साइटवर रोजंदारी मजूर म्हणून काम करत होती. तिच्या विजयाबद्दल बोलताना वर्षा म्हणते, “मी खूप आनंदी आहे. मी आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की मी एवढ्या पुढे जाऊन काही साध्य करू शकेन. माझे पती आणि मुलगा दोघेही माझ्या विजयाने खूप आनंदी आहेत. मुलगा सातव्या स्वर्गात आहे, कारण त्याने अशा गोष्टी कधीच पाहिल्या नाहीत. माझ्या विजयानंतर तो स्टेजवर नाचू लागला.
वर्षा पुढे म्हणाली, ‘त्याने मला सांगितले की आई, तू शो जिंकशील आणि तेच झाले. आमच्यासाठी सर्व काही नवीन आहे, आम्हाला येथे जे प्रेम आणि आनंद मिळाला, तो मला माझ्या आयुष्यात कधीच मिळाला नाही. शेवटच्या एपिसोडमध्ये रेमो डिसूजा, भाग्यश्री शिवदासानी आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासह खास पाहुणे रश्मिका मंदान्ना, नीना गुप्ता आणि गोविंदा देखील उपस्थित होते. त्यामुळे मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे वर्षा आणि तिच्या कुटुंबाला पारावार उरला नाही आहे.