31 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeKokanकोकणचे कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – शिक्षणमंत्री केसरकर

कोकणचे कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – शिक्षणमंत्री केसरकर

कोकणवासीयांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून नवीन गोष्टी स्वीकारायची तयारी ठेवावी.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कोकण सन्मान २०२२ या कार्यक्रमात बोलताना शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. या अंतर्गत कोकणचे कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया, असे प्रतिपादन यांनी केले.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले,  कोकणचे स्वत:चे असे वेगळे वैशिष्ट्य आहे. जंगल, किल्ले, समुद्रकिनारे अशा विविध प्रकारचे सौंदर्यची कोकणाला नैसर्गिक देणगी मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन समुद्रामध्ये किल्लयांची उभारणी केली. जेवढे बॅकवॉटर केरळमध्ये आहे, तेवढे कोकणातही आहे.

कोकणवासीयांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून नवीन गोष्टी स्वीकारायची तयारी ठेवावी. मातृभूमीचे ऋण फेडण्याचे काम महासंस्कृती व्हेंचर करत आहे. मंत्री केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृती दर्शवणाऱ्या ‘द अनएक्सप्लोरड् लीगसी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कोकणातील संस्कृतीचा वारसा दाखवणारे कार्यक्रम सादर करण्यात आले.

महासंस्कृती व्हेंचर्स या संस्थेच्या वतीने कोकणात उद्योग, पत्रकारिता, कृषी, कला, इतिहास, शिक्षण, व्यवसाय, सामाजिक बदल, संवर्धन, रिअल इस्टेट आणि इतर अनेक क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करून संस्कृती जपण्यात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना कोकण सन्मान २०२२ पुरस्कार देऊन गौरवले.

यामध्ये दापोलीतील वाणीतील व्यंगावर उपचार करणाऱ्या रेखा बागुल, रांगोळी कलाकार मनोज पाटील,  पर्यावरणविषयक काम करणारे दापोलीचे दिलीप कुलकर्णी, लोककला जपणारे गुहागर तालुक्यातील असगोलीचे श्री भैरी व्याघ्रांबरी नमन मंडळ, कातळशिल्प संवर्धन विषयात काम करणारी निसर्गयात्री संस्था, समाजसेवा करणारे राजरत्न प्रतिष्ठान रत्नागिरी, निसर्ग संवर्धनविषयी काम करणारे रत्नागिरीचे प्रा.सुरेंद्र ठाकूरदेसाई, शिक्षणक्षेत्रात काम करणारे देवरूखचे सदानंद भागवत, पालघरचे डॉ. विशाल कोडग्रीकर, उद्योजक मुकेश गुंदेचा, संगीतक्षेत्रात काम करणारे उमाशंकर दाते, राजापूरच्या अपूर्वा मराठे, उद्योजक अपूर्व फर्नांडिस, पत्रकार मयुरेश पाटणकर, प्रशांत परांजपे, डॉ. सुरेखा पाटील, कलाकार संजय पऱ्हाड, श्रेयस कुलकर्णी, प्रगत लोके, अंकिता वालावलकर, अनिकेत रासम, सतीश रहाटे व भाडीपा टीम यांचा सन्मान शिक्षणमंत्री दीपक केसरकर व उद्योजक अक्षय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular