27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

रत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्रात कोसळलेल्या तरूणीचे गूढ हळूहळू...

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...
HomeSindhudurgम्याव म्याव करणारे वाघाला घाबरुन की कोर्टाला घाबरुन लपून बसले – माजी...

म्याव म्याव करणारे वाघाला घाबरुन की कोर्टाला घाबरुन लपून बसले – माजी गृहराज्यमंत्री केसरकर

सोमवारपासून राणे अज्ञातवासात असून कुठेतरी दडून बसल्याचे बोलले जात आहे. त्यावरुनच दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर हल्ला चढवला.

कणकवलीतील संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून राणे अज्ञातवासात असून कुठेतरी दडून बसल्याचे बोलले जात आहे. त्यावरुनच दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर हल्ला चढवला. अधिवेशनाच्या दिवशी पायऱ्यावर बसून म्याव म्याव आवाज काढणारे, आज लपून बसले आहेत. अशी खोचक टीका शिवसेना नेते तथा माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर केली आहे.

पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आदित्य ठाकरेंना बघून म्याव म्याव आवाज करणारे, आज वाघाला घाबरुन की कोर्टाला घाबरुन लपून बसले आहेत काही कळत नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांचा तेवढा धाक असतोच ही वस्तुस्थिती असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. कोणी गुन्हा केला माहिती नाही, पण जे लपून बसले आहेत ते कायद्यापासून आणि पोलिसांपासून लपून बसले असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असल्याचे समजल्यावर नारायण राणे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. नारायण राणेंना देखील केसरकरांनी टोला लगावला आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, आपण केंद्रीय मंत्री आहात म्हणून मुलाला वाचवणार अशी भूमिका घेण्याचा विचार करत असाल, तर उत्तर प्रदेश मधील मंत्र्याच्या पुत्राला वाचवताना काय झाले ते ध्यानात असावे. असा सल्ला केसरकर यांनी नारायण राणेंना दिला आहे.

याआधीही सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले प्रकरणावरुन नितेश राणे यांना ५ दिवस पोलिस कोठडीत टाकण्यात आले होते. त्यांना त्यावेळी सशर्त जामीन मिळाला होता. न्यायालय जामीन देताना खंडणी, हल्ले करण्यासारखे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत, त्यांना जामीन देताना नक्कीच विचार करेल. असे केसरकर म्हणाले

दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम असल्याने, अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular