बॉलीवूड मधील अभिनेत्री दिशा पटनी हि जरी नवीन असली तरी ती अतिशय प्रसिद्ध आहे. दिशाचा चाहता वर्गही भलामोठा आहे. शिवाय दिशा सोशल मीडियावही बरीच सक्रिय असते. आज १३ जून, योगायोग म्हणजेच आजच्याच दिवशी दिशा पटनी आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मध्यंतरी आदित्य आणि दिशा यांच्या विशेष नात्याविषयी बरीच चर्चा रंगली होती. त्यात गेल्या वाढदिवसाला आदित्या ठाकरे यांनी दिशाविषयी एक खास कमेंट करून शुभेच्छा दिल्या होत्या.
शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने दोघेही एकमेकांना शुभेच्छा देतात. दोघे एकमेकांविषयी काय ट्विट करतील, भेटतील का, शुभेच्छा देतील का याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच एका वाढदिवसानिमित्त दिशाने ट्विट करत आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामध्ये तिने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाच चमकत राहा आणि खूप प्रगती कर’, असे ट्विट केलं होतं.
त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही दिशाला शुभेच्छा दिल्या होत्या .‘धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी १३ जून रोजी वाढदिवसा निमित्त ‘तुला सुद्धा शुभेच्छा’ असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि खूप प्रगती कर’, अशा खास शुभेच्छा आदित्य यांनी दिशाला दिल्या होत्या. त्यामुळे या शुभेच्छांवरून अनेक तर्क वितर्क काढण्यात आले. दिशा पटनी हिने रोखठोक उत्तर देत असं म्हटलं होतं की, ‘आपण आपल्या मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का? मी या क्षेत्रात येण्याआधीच मला माहीत होते की लोकांच्या नजरा सतत मी काय करते यावर असणार आहेत. पण, लोक काय म्हणतील या गोष्टीचा मला फरक पडत नाही.