26.1 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeRatnagiriदिवाळीत एस.टी. बसचेही भाडे वाढणार

दिवाळीत एस.टी. बसचेही भाडे वाढणार

महामंडळाकडून उत्पन्नवाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते.

राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळीत भाडेवाढ जाहीर करण्यात येते. १० ते १५ टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडून दरवाढीबाबत सूचना नसल्या तरी लवकरच त्या प्राप्त होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुट्टी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोंकण विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे. महामंडळाकडून उत्पन्नवाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. त्यामुळे दिवाळीत सुट्टीत वाढीव तिकीट दराचा फटका प्रवाशांना बसतो. सुट्टीमध्ये देवदर्शन व पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

महिला सन्मान व अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेमुळे एस.टी. च्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. दिवाळी सुट्टी गर्दीच्या मार्गावरील फ या वाढविण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे कोल्हापूर, तुळजापूर मार्गावर जादा गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. सध्या १० जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. जादा गाड्यांचे ऑनलाईन आरक्षण सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे. महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत असून हंगामी भाडेवाढीत तिकीट दराच्या ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

जादा फेऱ्यांसाठी गाड्या सोडण्यात येत असताना ग्रामीण भागांतील फ यासाठी एस.टी. उपलब्ध नसल्याने प्रवाशांवर अन्याय होत असल्याने सुबोध पेडणेकर या प्रवाशाने सांगितले. तर नितीन पाटील म्हणतात की, सुट्टीत एस.टी. कडून जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. लांब पल्ल्यांसाठी जादा गाड्या सोडताना ग्रामीण भागातील वेळापत्रक मात्र कोलमडते.

RELATED ARTICLES

Most Popular