31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

रत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एस.टी. डेपोंना...

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...
HomeChiplunवाट्टेल ते करा पण आमच्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधून काढा निलिमा चव्हाण मृत्यूप्रकरण...

वाट्टेल ते करा पण आमच्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधून काढा निलिमा चव्हाण मृत्यूप्रकरण…

‘काय वाट्टेल ते करा पण आमच्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधून काढा…. त्याला आमच्या तांब्यात द्या… पोलीस अजून करताहेत काय?’, असा सवाल आणि आक्रोश करीत हजारो महिलांसह चिपळूणमधील सारे बांधव पोलीस स्थानकावर गुरूवारी धडकले. चिपळूणकर महिला आणि जनतेच्या तीव्र भावना पोलिस यंत्रणेला पहावयास मिळाल्या. अनेक महिलांना आपले अश्रू आवरणेही अवघड झाल्याचे पहावयास मिळाले. चिपळूण तालुक्यातील ओम ळी येथील निलिमा चव्हाण हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या डोक्यावरचे केस काढण्यात आले. तिच्या भुवयाही काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर तिचा मृतदेह खाडीत सापडला. निलिमच्या हत्येने सारा जिल्हा हादरला आहे.

जोरदार उठाव – दापोली येथे बँकेत सव्हीसला असणाऱ्या निलिमा चव्हाण हिच्या निर्घृण हत्येनंतर राजकीय, सामाजिक संघटनेसह सर्व समाजबांधव आक्रमक झाले आहेत. महिला तर आक्रमक भूमिका घेत गत दोन दिवस तात्काळ आरोपींना अटक करा या मागणीचे निवेदन चिपळूण पोलीस स्थानकात देत आहेत.

जनता एकवटली – गुरूवारी संध्याकाळो कॅण्डल मार्च आयोजित करण्यात करून श्रद्धाजली वाहण्यात येणार होती. मात्र चिपळूणम ध्ये जमावबंदी आदेश असल्याने श्रद्धांजली कार्यक्रम रद्द करण्यात आला. तरीही गुरूवारी सायंकाळी हजारोच्या संख्येने चिपळूणमधील महिला आणि पुरुष पोलीस स्थानकावर धडकले होते.

त्याला ताब्यात द्या – प्रचंड संख्येने जमाव बाहेर उभा असल्याने डीवायएसपी राजमाने यांनी समोर येत महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित महिलांनी त्या नराधमाला पकडून आमच्या तांब्यात द्या, त्याला आम्ही बघतो… आम्हाला न्याय पाहिजे आहे, आम्ही गप्प बसणार नाही, अशा भावना व्यक्त केल्या.

अश्रू अनावर – निलिमा चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्यूने संताप दिसत होता. मोर्चात सहभागी झालेल्या अनेक महिलांना आपले अश्र थांबवणे अनावर झाले होते. ढसाढसा रडत निलिमाच्या नातेवाईकांना न्याय देण्याची मागणी करीत होते.
तपास जलदगतीने – खरे तर हा तपास दापोली ‘पोलिसांकडे आहे. चिपळूण पोलीस स्थानकावर अनेक संघटना सामाजिक संस्था धडकत आहेत. गुरूवारी म हिलांच्या भावना जाणून घेतल्यानंतर डीवायएसपी राजमाने यांनी आमचा तपास जलदगतीने सुरू आहे. लवकरच यासंदर्भात साऱ्याचा उलगडा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सारे एकत्र – उद्धव ठाकरे यांची शिवसेना पदाधिकारी, राष्ट्रवादी, कॉग्रेस, आरपीआय, शिवसेना, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य जनता असे सा एकत्र पोलीस स्थानकावर धडकल होते.

RELATED ARTICLES

Most Popular