27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriवैभववाडी-कोल्हापूर रेल्वेसाठी डीपीआर

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेसाठी डीपीआर

या रेल्वेमार्गामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन व वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे.

वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवण्याचे आदेश निघाले आहेत. हा प्रकल्प पीएम गतीशक्तीमधून घेण्यात आला असल्यामुळे कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. ३४११.१७ कोटींचा वैभववाडी- कोल्हापूर प्रस्तावित रेल्वे मार्ग पंतप्रधान गतीशक्ती योजनेखाली घेतल्यामुळे प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, अशी महिती नॅशनल प्लॅनिंग ग्रुपचे सेक्रेटरी सुमित डावरा यांनी दिली. या मार्गावरील उतारामुळे लांबी २८ किमीने वाढण्याची शक्यता आहे.

खरं पाहता, सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना ५० कोटीची तरतूद झाली होती. अर्थात, रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरीचा प्रतिक्षेत प्रकल्प आहे, अशी माहितीही अॅड. पाटणे यांनी दिली. कोकणचा चेहरामोहरा बदलवून टाकणाऱ्या वैभववाडी कोल्हापूर या १०७.६५ कि. मी. लांबीच्या प्रकल्पाला केंद्र सरकार कधी मंजुरी देणार, हा प्रश्न कोकणवासीयांना पडला होता. या रेल्वेमार्गामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन व वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांती होणार आहे. या मार्गावर वैभववाडी, उंबार्ड, उपाले, गगनबावडा रोड, माडूळ, मल्हारपेठ, खुपिरे, रजपुतवाडी, वळीवडे, गूळ मार्केट, कोल्हापूर ही स्टेशन्स व २७ बोगदे आणि २५ पूल प्रस्तावित आहेत.

७० वळणांमधून १० स्टेशने पार करत ११० किमी वेगाने रेल्वे कोल्हापूरला पोहोचेल तेव्हा खऱ्या अर्थान कोकणच्या विकासाला चालना मिळणार आहे, असे अॅड. पाटणे म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रातून रोज किराणा, दूध, अंडी, भाजीपाला यासारखा ८०० ते १००० टन माल कोकणात येतो. कोकणातून आंबे, मासे यांची जलद वाहतूक होईल. कोकणातील पर्यटक तिरूपती, तुळजापूर, पंढरपूर येथे जाण्याकरिता तर पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक कोकणातील गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली किनाऱ्यावर उतरण्याकरिता याच रेल्वेमार्गाचा वापर करतील.

RELATED ARTICLES

Most Popular