27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeMaharashtraमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडीवर टीकास्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडीवर टीकास्र

आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. रात्री २ वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. या याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण करून एका दहशतवाद्याच्या प्रतिमेचं संवर्धन केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, याकूब मेननच्या कबरीचं कोणत्याही प्रकारचं सुशोभिकरण झालं नसल्याचं या कब्रिस्तानच्या ट्रस्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भात वेगवेगळे दावे-प्रतिदावे सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर चांगलाच तोंडसुख घेतले आहे.

मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना कोण कोण संरक्षण देतं हे आम्ही पाहिलं आहे. त्यांचे साथीदार अजूनही जेलमध्ये बसले आहेत, ज्यांना मंत्री बनवलं गेलं”, असं फडणवीस म्हणाले. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना दोषी ठरवले. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे.

तसेच, “सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. रात्री २ वाजता सर्वोच्च न्यायालय उघडलं. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिली गेली. हे प्रतिमा संवर्धन कुणाच्या काळात झालं, हे तुम्हाला माहिती आहे”, अशा सूचक शब्दांत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.

याकूब मेमनच्या कबरीवरून सध्या राज्यात मोठा वाद सुरू आहे, याप्रकरणी शिवसेना-भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान आता याकूब मेमनची कबरसाठी ट्रस्टच्या विश्वस्तांना धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर वाद पेटला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular