25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeMaharashtraडॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग यांच्या मोठ्या मुलीने त्यांच्या चितेला अग्नी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, रामदास आठवले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह संपूर्ण गांधी कुटुंब यावेळी उपस्थित होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी काल ठेवण्यात आले होते. तेथे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आज सकाळी त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. तेथेही त्यांच्या पार्थिवाचे अनेकांनी दर्शन घेतले. काँग्रेस मुख्यालयापासून निगम बोध घाटाकडे आज पार्थिव रवाना झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिन्ही दलाकडून त्यांना सलामी देण्यात आली.

तत्पूर्वी काँग्रेस मुख्यालयापासून निगमबोध घाटापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते ‘जब तक सूरज चांद रहेगा, मनमोहन आपका नाम रहेगा’ और ‘मनमोहन सिंह अमर रहें’, अशा घोषणा देत होते. सिंग यांचे पार्थिव ज्या वाहनात ठेवण्यात आले होते, त्या गाडीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सिंह यांचे कुटुंबीय आणि काँग्रेसचे काही नेते बसले होते. अंत्यसंस्कारापूर्वी मनमोहन सिंग यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालय ‘२४ अकबर रोड’ येथे ठेवण्यात आले होते, जिथे सोनिया, गांधी, खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव निगम बोध घाटावर नेण्यात आले. तेथे त्यांच्या मुलींनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी विशिष्ट प्रोटोकॉलचेही पालन करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवण्यात आला होता. त्यासोबतच अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना २१ तोफांची सलामी दिली गेली. यानंतर या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. मनमोहन सिंग यांच्या मोठ्या मुलीने त्यांच्या चितेला अग्नी दिला. यावेळी उपस्थितीत असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. डॉ. सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) निधन झाले. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाच्या उभारणीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय लढाई सुरू आहे. मात्र, डॉ. सिंग यांचे स्मारक ट्रस्ट स्थापन करून उभारले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular