25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriबिबट्या हल्ल्याच्या प्रकारात कमालीची वाढ

बिबट्या हल्ल्याच्या प्रकारात कमालीची वाढ

जिह्यात बिबट्या, रानगवे, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या दिवसागणिक वाढलेली आहे.

जिल्ह्यात वन्य प्राण्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेतच, पण अलिकडच्या काळात बिबट्या, रानगवे आदी वन्य पाण्यांपासून शिकारीच्या शोधात असताना बिबटे पाळीव प्राण्यांबरोबरच आता माणसांवरही हल्ले करू लागले आहेत. गेल्या २००६ ते सद्या २०२४ या कालावधीत २ हजार ९०८ लोकांना वन्यपाण्यांचे हल्ले, शेतीचे नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यात आतापर्यंत २६ लोकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्यात. वनविभागामार्पत अशा नुकसानग्रस्तांना आतापर्यंत सुमारे २ कोटी ४२ लाख ४९ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होऊ लागल्याने या प्राण्यांना अन्न व पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मानवी वस्तीपर्यंत अलिकडे या प्राण्यांचा वावर वाढला आहे. जिह्यात बिबट्या, रानगवे, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची संख्या दिवसागणिक वाढलेली आहे. या प्राण्यांकडून पशुधनावर हल्ला केला पिकांचीही नासधूस केली जात आहे. या प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच बिबट्याकडून पाळीव पशुधनावर हल्ले करीत आहेत. गेल्या २०० वर्षांच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यात जवळपास २ हजार २४७ पाळीव प्राण्यांवर हल्ले व त्यांचा बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन गमावल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागाकडून या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे.

त्या पशुपालक नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना १ कोटी ५७ लाख ३५ हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात आली आहे. याच कालावधीत पिकांचीही वन्य प्राण्यांची मोठी हानी केलेली आहे. त्याचा फटका ६०८ शेतकऱ्यांना बसला असून सुमारे ३८ लाख ६९ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. बिबट्या, ‘रानगवे, डुक्कर यांनीही माणसांवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये २०१९-२० ते २०२३-२४ नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण २६ जणांवर गंभीर ते किरकोळ स्वरूपाचे हल्ले झाले. अशा जखमी लाभार्थ्यांना सुमारे ४६ लाख ४५ हजार हजाराची मदत वाटप करण्यात आली आहे.

एकूणच २ हजार ९०८ लाभार्थ्यांना जिल्ह्यात २ कोटी ४२ लाख ४९ हजार ३८० रुपयांची मदत शासनामार्पत वनविभागाने वितरीत केली आहे. जिल्ह्यात बिबट्या व आदी वन्यपाणी हल्ल्यातील लोक आणि त्यांना दिलेली मदत सन २०१९-२० यावर्षी एकूण १६ लोकांवर हल्ला झाला. त्यांना ७ लाख १५ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. सन २०२०-२१ मध्ये हल्ला झालेल्या ६ जणांना ४ लाख १० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. सन २०२२-२३ या वर्षी हल्ला झालेल्या ३ जणांना ३३ लाख ९५ हजारांची मदत देण्यात आली. २०२३-२४ नोव्हेंबर या वर्षी एका गंभीर जखमीला १ लाख २५ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular