जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कदम फाऊंडेशन अपेडे या संस्थेमार्फत जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ३६५ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. हि स्पर्धा तीन गटात घेतली गेली असून, प्रत्येकी तीन याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कदम फाऊंडेशन अपेडे संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठीच्या तीन गटातील जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे परीक्षण कामकाज विनय माळी, रमेश गाढवे आणि श्री. मृदुल मानकामे यांनी पाहिले. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या गटामध्ये नियती बाळाराम खेडेकर, रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड शाळेची विद्यार्थिनी विजेती ठरली आहे तर आर्या रूपेश शिंदे, गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूल, लांजा ही द्वितीय तर आर्वी प्रशांत लोंढे माय छोटा स्कूल रत्नागिरी ही तृतीय विजेती ठरली आहे. दुसऱ्या गटामध्ये त्रिवेणी चंद्रकांत गमरे रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल खेड ही विद्यार्थिनी प्रथम, सारा योगेश वनकर झेड. पी. शाळा क्र.४ संगमेश्वर ही द्वितीय तर अनन्या निलेश दोंडे रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल खेड ही तृतीय क्रमांकावर बक्षीसपात्र ठरली आहे. तिसऱ्या गटात विघ्नेश विवेक आचार्य, गोविंदराव निकम कॉलेज सावर्डे याने प्रथम क्रमांक पटकावला असून, श्रावणी चंद्रशेखर पवार जी.जी.पी.एस रत्नागिरी ही द्वितीय आणि ऋषभ हर्षद कोतवडेकर आर. बी. शिर्के प्रशाला रत्नागिरी याने तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी ४ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. प्रथम क्रमांक विजेत्यास १००० रु. द्वितीय विजेत्यास ७०० रु. आणि तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला प्रत्येकी ५०० रुपये देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात येणार आहे.