मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे रिलायन्स पेट्रोल पंपानजीक खासगी आरामबस उलटून झालेल्या अपघातात २७ जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. परळ – खेड बस ही केळणे गावात एका लग्नासाठी जात होती. भरणे गोवळवाडी भागात जात असताना महामार्गाच्या कडेला खड्ड्यात जाऊन गाडी पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे. भरणे नाक्याजवळ रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ही बस सकाळी ६ च्या सुमारास पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीला धाव घेतली तर पोलिस प्रशासन देखील दाखल झाले आहे. दरम्यान यामध्ये २५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वेगाने असलेली गाडी अचानक पळती झाल्याने, गाडीचा आवाज आणि प्रश्नांची ओरड ऐकून अनेक लोक गोळा झाले. अपघात घटनास्थळी खेड पोलीस व मदत ग्रुपचे कार्यकर्ते यांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना कळंबणी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. या सगळ्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. यातील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई परेल येथून केळणे गोमळेवाडी येथे लग्नकार्यासाठी मार्गस्थ झालेली ही बस होती. महामार्गावरील भरणे नाका येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाला डुलकी लागल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने चालकाचे नाव समजू शकलेले नाही. याबाबत अल्पेश अरूण गोमले यांनी याबाबत येथील पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. चालक एमएच ०४/जीपी २३१९ क्रमांकाच्या खासगी आरामबसमधून २७ प्रवाशांना घेऊन परळ येथून तालुक्यातील केळणे-गोमलेवाडी येथे लग्नकार्यासाठी जात असताना चालकास झोप अनावर झाल्याने बस पलटी होऊन हा अपघात घडला. या अपघातप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.