28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeKhedखेड लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट, एक कामगार जखमी

खेड लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट, एक कामगार जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीत शनिवारी मध्यरात्रीनंतर प्रिव्ही कंपनीत आग लागल्याची घटना घडली.

कोकणातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीत शनिवारी मध्यरात्रीनंतर प्रिव्ही कंपनीत आग लागल्याची घटना घडली. यावेळी एकापाठोपाठ एक झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला. या आगीमध्ये एका कामगाराला भाजून इजा झाली असून,  कंपनीचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाच्या मोठ्या आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरून गेला असून, अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा देखील फुटल्या. धुराचे लोट तर तब्बल १० किमी अंतरावरून सुद्धा स्पष्ट दिसून येत होते.

राज्यातील सर्वात मोठी रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे येथे आहे. गेल्या दोन वर्षात या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यातून अनेक दुर्घटना घडून काही कामगारांना त्यामध्ये प्राण गमवावे लागले आहेत, तर काही जण गंभीर जखमी  झाले आहेत. या दुर्घटनांमुळे लोटे पंचक्रोशीतील भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शनिवारी दि. १६ रोजी मध्यरात्री नंतर प्रिव्ही कंपनी म्हणजेच जुनी रत्नागिरी केमिकल या कंपनीत प्रक्रियेच काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन आग लागली.

लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. घटनास्थळावरुन प्राप्त माहितीनुसार, येथील प्रिव्ही कंपनीत कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कंपनीमध्ये केमिकल प्रक्रीया सुरु असताना हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्फोटाची माहिती मिळताच खेड नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तत्परतेने आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले. यामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नसुन, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular