25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नागिरी सिव्हिलमध्ये दारू पिऊन डॉक्टरचा गोंधळ

रत्नागिरी सिव्हिलमध्ये दारू पिऊन डॉक्टरचा गोंधळ

मद्यप्राशन करून एक डॉक्टर थेट वॉर्डमध्ये आला.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रताप उघड झाला आहे. मद्यप्राशन करून हे महाशय रुग्णालयात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा रुग्णालय चर्चेत आले आहे. याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला मेमो देऊन त्याच्याकडून खुलासा मागविला आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले. संबंधित डॉक्टर नॉट रिचेबल आहेत.

मद्यप्राशन करून एक डॉक्टर थेट वॉर्डमध्ये आला. त्याने तेथे विचित्र हावभाव करत रुग्णांना तपासण्याचा प्रयत्न केला; परंतु रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरची परिस्थिती पाहून आक्षेप घेतला. हा प्रकार कॅमेराबद्ध झाला आणि तो व्हायरल झाल्याने जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले. रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्या संबंधित डॉक्टराबाबत तक्रारी वाढल्याने आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी त्याला मेमो देत घडलेल्या प्रकाराचा खुलासा त्याच्याकडून मागविला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular