22.8 C
Ratnagiri
Wednesday, December 17, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeKhedपरतीच्या पावसामुळे कशेडी घाटात अपघात, चालक बालंबाल बचावला

परतीच्या पावसामुळे कशेडी घाटात अपघात, चालक बालंबाल बचावला

निसरड्या झालेल्या रस्त्यावरून दगडी कोळसा वाहू ट्रक उलटून कशेडी घाटामध्ये अपघात झाला.

संपूर्ण जिल्ह्यासह खेड तालुक्यात परतीच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असल्याने निसरड्या झालेल्या रस्त्यावरून दगडी कोळसा वाहू ट्रक उलटून कशेडी घाटामध्ये अपघात झाला. कशेडी घाटात झालेल्या या अपघातात चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. अपघातानंतर कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महाडवरून लोटे औद्योगीक वसाहतीत दगडी कोळशाची वाहतूक करणारा ट्रक कशेडी घाट उतरत असताना सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक काळकाई मंदिराजवळ पलटी झाला. या अपघातात ट्रकचा चालक मात्र नशिबाने बचावला आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून खेड तालुक्यत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार वादळी सदृश्य वाऱ्यासह, कडकडाटी विजांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने, महामार्ग निसरडा झाला आहे. शिवाय घाटात पावसामुळे निर्माण झालेल्या धुक्यामुळे वाहने हाकताना चालकांचा कस पणाला लागते.

या अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून कोंडी निर्माण झाली. महामार्गावरून प्रवास करणारे अनेकजण बरेच तास तिथेच अडकून पडले. अपघाताची खबर मिळताच कशेडी टॅप चे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान खेड पोलीस देखील घाटात दाखल झाले होते. रस्त्यात पलटी झालेल्या ट्रक क्रेनच्या सहाय्य्यने बाजूला करून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून देण्यात आली. त्यामुळे अखेर काही तासांचा कालावधी गेल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.

RELATED ARTICLES

Most Popular