25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraम्हाडाची आजची परीक्षा अचानक रद्द, कारण आले पुढे

म्हाडाची आजची परीक्षा अचानक रद्द, कारण आले पुढे

कोविड काळापासून शाळा, कॉलेजपासून अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्याचप्रमाणे संसर्गाच्या भीतीने शासनाच्या भरतीच्या सुद्धा अनेक ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात आल्यात. मध्यंतरी आरोग्य भरतीची परीक्षा सुद्धा काही कारणास्तव रद्द करण्यात आली. आणि आज रविवारी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा, मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित केलेली परीक्षा अचानक रात्री रद्द करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच परीक्षार्थींना होणाऱ्या आणि झालेल्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली.

म्हाडासाठी सकाळ सत्रामध्ये सहायक अभियंता, सहायक विधी सल्लागार, कार्यकारी अभियंता, उप अभियंता तर, दुपारच्या सत्रामध्ये कनिष्ठ अभियंता पदाची होणारी परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी पेपर फुटण्याचे प्रकरण पुढे आले आहे. पुणे सायबर पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोन एजंट आरोपी बुलढाण्याचे तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील आरोपी आहे. शनिवारी रात्री १० वाजता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रभर चौकशी केली, त्यानंतर सकाळी त्यांना अटक करण्यात आली.

रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरला तसंच म्हाडाच्या वेबसाईटवर एका व्हिडीओ पोस्ट केला असून ही परीक्षा आता पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार असल्याची माहिती दिली. परंतु, परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातुन अनेक विद्यार्थी पुणे, मुंबई, बारामती आदी विविध केंद्रात जाऊन पोहचले होतेत. आधीच एक तर एसटीच्या असलेल्या संपामुळे त्रस्त झालेली जनता, आर्थिक ताण सहन करून परीक्षा केंद्रावर दाखल झाली तर  आता रद्द करण्यात आलेय परीक्षेच्या मध्यरात्री करण्यात आलेल्या घोषणेमुळे त्रासाला सामोरे जावे लागले आहे. घोषणा आधीच किमान काल सकाळ पर्यंत केली असती तर नाहक धावपळ,त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular