20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeEntertainment"सिंहावलोकनाची वेळ”- डॉ. अमोल कोल्हे

“सिंहावलोकनाची वेळ”- डॉ. अमोल कोल्हे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे काही काळासाठी एकांतवासामध्ये जात आहेत. तसं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून सांगितलं आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती स्पष्ट केली आहे. त्यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय आहे ते त्यांच्याच शब्दात पाहू, शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी मनन आणि चिंतनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि कदाचित पुनर्विचार सुद्धा! करणार असल्याचं पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

“सिंहावलोकनाची वेळ” गेल्या काही दिवसां, महिन्यां, वर्षांमध्ये बेभान होऊन सर्वत्र कार्य करत धावत राहिलो,  काही निर्णय अगदी टोकाचे घेतले,  अनपेक्षित पावले उचलली आहेत. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण,  तारेवरची कसरत,  वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे प्रचंड थकवा आला आहे. थोडा शारीरिक आणि बर्याच प्रमाणात मानसिक ! त्यासाठीच काही काळासाठी एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही!  पुन्हा भेटू लवकरच. नव्या जोमाने, नव्या जोशाने!

काही काळ आपण कुणा सोबतही संपर्कात नसण्याची फेसबुक पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे. काही निर्णयांचा विचार करण्यासाठी आणि कदाचित फेरविचार करण्यासाठी आपल्याला एकांत हवा असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं कोल्हे नेमके  कुठल्या निर्णयाचा फेरविचार करणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीतून राजकारणामध्ये एन्ट्री करण्याच्या निर्णयाचा तर त्यांना पछतावा होत नसेल! याबाबत फेरविचार करणार असतील का ! असाही प्रश्न यानिमित्ताने काही जणांना पडला आहे.

त्यांनी विशेष टीप देखील दिली आहे कि, फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतन शिबिरासाठी नाही आणि हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular