26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiri'वंदे भारत'मुळे कोकण मार्गावर अन्य गाड्या रखडतात प्रवासी नाराज

‘वंदे भारत’मुळे कोकण मार्गावर अन्य गाड्या रखडतात प्रवासी नाराज

मुंबई-मडगाव या कोकण रेल्वे मार्गावर ‘वंदे भारत’ ही सुपरफास्ट गाडी सुरू करण्यात आली. या गाडीमुळे कोकणात जाणाऱ्या अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. ‘वंदे भारत’ गाडीला मोजकेच थांबे दिले आहेत. या गाडीला पुढे जाण्यासाठी नियमित धावणाऱ्या गाड्या बाजूला थांबावण्यात येतात. परिणामी जनशताब्दी, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस, तेजस एक्सप्रेस या गाड्या उशिराने धावत आहेत, अशी नाराजी संगमेश्वरचे संदेश जिमन यांनी व्यक्त केली. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावांचा विचार केला, तर हजारो प्रवासी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसने प्रवास करू इच्छितात. त्यांच्या सुविधांचा आणि आपल्या वाढत्या उत्पन्नाचाही विचार प्रशासनाने केला पाहिजे.

‘वंदे भारत’ ही अति जलद गाडी असल्याने तिला कमी थांबे दिले आहेत. या गाडीमुळे इतर गाड्यांचा विलंब सर्वसामान्य प्रवाशाला सहन करावा लागत आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थानिकांसाठी जास्तीत जास्त गाड्यांचे नियोजन करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. केवळ गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या धनाढ्य प्रवाशांसाठीच ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे, हे स्पष्टच आहे. या गाडीमुळे कोकणात जाणाऱ्या इतर गाड्यांचे वेळापत्रक ढासळले आहेच शिवाय मोजकेच थांबे दिल्यामुळे इतर स्थानकांवर जाणाऱ्या कोकणवासी प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. वंदे भारतसाठी वेगळा न्याय आणि संगमेश्वर स्थानकासाठी मात्र अन्याय, असा दुजाभाव न दाखवता सर्वांगीण सुविधेसाठी पावलं उचलावीत, असे आवाहन जिमन यांनी कोकण रेल्वेला केले आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास प्रखर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular