28.5 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeKhedगुहागरमध्ये महायुतीच्या राजकारणात द्विस्ट! राजेश बेंडलना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली

गुहागरमध्ये महायुतीच्या राजकारणात द्विस्ट! राजेश बेंडलना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली

राजेश बेंडल हे गुहागरचे माजी आमदार रामभाऊ बेंडल यांचे चिरंजीव आहेत.

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने मंगळवारपासून सुरु होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत असून महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्येही जागा वाटपाची रस्सीखेच पहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार लढणार की भाजपचा या विषयी अजूनही संभ्रम कायम असतानाच शिंदेंच्या शिवसेनेकडून खा. शिंदे यांचे मेहूणे विपूल कदम यांच्याऐवजी गुहागरचे माजी नगराध्यक्ष आणि माजी सभापती राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजेश बेंडल यांनी बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासमवेत रविवारी मध्यरात्री उशिरा भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे शिवसेनेकडून या मतदारसंघात बहूसंख्येने असलेल्या कुणबी सम ाजबांधवाचा प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. राजेश बेंडल हे गुहागरचे माजी आमदार रामभाऊ बेंडल यांचे चिरंजीव आहेत.

भाजपचा बालेकिल्ला – रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला होता. २००९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा मतदारसंघ भाजप नेत्यांकडे शब्द टाकत रामदास कदम यांच्यासाठी मागून घेतला होता. मात्र रामदास कदम यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून या मतदारसंघावरती आमदार भास्कर जाधव यांचे एकहाती वर्चस्व आहे. या वेळेला जाधव यांच्यासमोर महायुती कोणत्या चेहऱ्याला या मतदारसंघात उमेदवारीची संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विकास आघाडीची स्थापना – सहा वर्षांपूर्वी गुहागर नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी भास्कर जाधव यांच्या विरोधात सर्वपक्षीय गुहागर शहर विकास आघाडी स्थापन करून डॉ. विनय नातू, राजेश बेंडल यांच्या पुढाकाराने गुहागर नगरपंचायतीत सत्ता आणण्यात यश आलं होतं. त्यावेळेला राजेश बेंडल हे गुहागर शहर विकास आघाडीकडून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. ते यापूर्वी गुहागर पंचायत समितीचे सभापती राहिले, आहेत. कुणबी, समाजाचे असलेले बेंडल हा बहुजन समाजाचा चेहरा गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव यांच्यासम पेर उतरवण्यासाठी शिवसेना भाजप व अजितदादांची राष्ट्रवादी या पक्षाचे तीनही नेते त्यांच्या नावावरती गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे. महायुतीकडून सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी गुहागर विधानसभा मतदारसंघा संदर्भात निर्णय होऊ शकतो.

श्रीकांत शिंदेच्या मेहुण्याचीही चर्चा – गुहागर विधानसभा मतदारसंघातून खा. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्या नावाचीही चर्चा होती. विपुल कदम यांच्यापाठी श्रीकांत शिंदेंची ताकद आहे. पण, तरी विद्यमान आमदार भास्कर जाधवांना टक्कर देणे सोपं नसेल. विपुल कदम यांनी या संदर्भात कोणती थेट प्रतिक्रिया न देता मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गुहागरमध्ये आलो आहे या सगळ्यांचे निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीच्या नेत्यांचा असल्याचे म्हटले आहे.

वर्षावर भेट – श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम या नवीन चेहऱ्याला उमेदवारी मिळावी यासाठी गुहागरचे शिवसेनेचे काही पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरा मुंबई येथे गेले होते. मात्र, त्याच दरम्यान राजेश बेंडल व अशोक वालम हे देखील मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने आता नवा ट्रिस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे कोणाला येथून उमेदवारी देतात की भाजप आपला पारंपारिकं मतदारसंघ जागा वाटपात मिळवते हे पहाणे औत्सुक्याचं ठरेल.

RELATED ARTICLES

Most Popular