केंद्र व राज्य सरकारने शिधापत्रिका पडताळणी आणि ई-केवायसी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये काही प्रमाणात कार्डधारकांनी ई-केवायसी केली; परंतु अजूनही जिल्ह्यात सव्वातीन लाखांहून अधिक लाभार्थ्यांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे पडताळणी राहिली आहे, अशांनी लवकर ती पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २ लाख ८२ हजार २७३ शिधापत्रिका आहेत. केंद्र व राज्य सरकारने शिधापत्रिका पडताळणी आणि ई-केवायसीची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात ११ लाख ३१ हजार २५६ लाभार्थी आहेत. यापैकी आधार सीडिंग झालेले १० लाख ९९ हजार ८४४ लाभार्थी आहेत. आधार पडताळणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ४ लाख २५ हजार ६८० एवढी आहे. ई-केवायसी प्रस्ताव ११ हजार ६३८ लोकांचे फेटाळण्यात आले. रास्त भाव धान्य दुकानदारांनी पडताळणी प्रक्रिया नोंदवली; परंतु अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले ३ लाख ६१ हजार ३५१ एवढे लाभार्थी प्रलंबित आहेत.
अद्याप ई-केवायसी पूर्तता न केल्याने ३ लाख ३२ हजार ५८७ एवढे लाभार्थी असून, आधार पडताळणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ६९.५७ एवढी आहे. काही लाखांत लाभाथ्यर्थ्यांचे ई-केवायसी प्रस्ताव प्राप्त झालेले नसल्याने हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत ई-केवायसीसाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. तहसीलदार पातळीवरून या कामासाठी पाठपुरावा होत आहे. ई-केवायसीचे काम लांजा तालुक्यात सर्वोत्तम ७७.८४ टक्के, तर सर्वांत कमी राजापुरात ५८.०४ टक्के एवढे काम झाले आहे. सर्व लामार्थ्यांनी लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी प्रशासकीय स्तरावरून आवाहन करण्यात येत आहे.