23 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriटेंपो भरून गोळा केला ई-कचरा…

टेंपो भरून गोळा केला ई-कचरा…

ई-यंत्रण उपक्रमाचे उद्घाटन खेडशीतील अनुश्रुती एंटरप्रायझेस येथे झाले.

रत्नागिरीत प्रजासत्ताक दिनी पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि अनबॉक्स युवर डिझायरच्या वतीने आयोजित ई-यंत्रण उपक्रमाला रत्नागिरीतील १५० नागरिकांनी प्रतिसाद दिला. बंद पडलेले लॅपटॉप, एलईडी टीव्ही, चार्जर, केबल, कॅसेट, सीडी असे जवळपास एक छोटा टेंपा भरेल इतका कचरा गोळा करण्यात आला असून तो पुनर्प्रक्रियेसाठी कंपनीकडे पाठवण्यात आला आहे. ई-यंत्रण उपक्रमाचे उद्घाटन खेडशीतील अनुश्रुती एंटरप्रायझेस येथे झाले. या वेळी पूर्णम फाउंडेशनच्या दक्षता परब म्हणाल्या की, आजच्या काळात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणेही लवकर बदलावी लागत आहेत. म्हणूनच ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होण्याचे प्रमाण मोठे आहे. ई-कचऱ्याच्या निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास किंवा पुनर्वापर न केल्यास हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होते.

म्हणूनच ई-यंत्रण हा ई-कचरा संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला. पूर्णम फाउंडेशन ही शाश्वत जीवनशैलीवर काम करणारी संस्था आहे. सणासमारंभाच्या निमित्ताने आपण घरात स्वच्छता करतो, त्या वेळी वापरल्या न जाणाऱ्या किती गोष्टी घरात आहेत, याचा अंदाज येतो. असा इलेक्ट्रॉनिक कचरा संकलित करून तो पुनर्वापर करणाऱ्या अधिकृत कंपन्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम फाउंडेशनतर्फे केले जाते. अनबॉक्स युवर डिझायरच्या गौरांग आगाशे यांनी रत्नागिरी शहरात १५ संकलन केंद्रे केली होती. शहरातील सर्वच केंद्रांवर ई-कचरा संकलनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ई-कचरा आणून देणाऱ्यांना “अनबॉक्स’ ‘तर्फे कुपन देण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, मकरंद पटवर्धन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनुश्रुती एंटरप्रायझेसचे कोनकर कुटुंबीय, खेडशी, श्रीनगर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दर महिन्याला संकलन – ‘अनबॉक्स’कडून गेल्या वर्षापासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी घरी येऊन प्लास्टिक संकलन केले जाते. आता त्या उपक्रमांतर्गत ई-कचऱ्याचेही संकलन केले जाणार आहे, अशी घोषणा गौरांग आगाशे यांनी यावेळी केली. शहरातील सर्व स्वयंसेवक आणि संकलन केंद्रांनी, तसेच नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केल्यामुळे उपक्रम यशस्वी झाल्याची भावना व्यक्त करून आगाशे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular