19.8 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraनारायण राणेंच्या वक्तव्याचे अनेक पडसाद, सर्व पक्षांची टीका

नारायण राणेंच्या वक्तव्याचे अनेक पडसाद, सर्व पक्षांची टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरु असलेल्या जन आशिर्वाद यात्रेच्या पाचव्या दिवसाला भलतेच वळण लागले आहे. या यात्रेच्या सुरूवातीपासून नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी पदाचे भान न ठेवता, टिपण्णी केली आहे.

रायगड महाडमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून, तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? “लहान मुलांना कोरोना बाधित होणार आहे,  असे अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं” तसेच स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. “मुख्यमंत्री असून ज्यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती”  असे नारायण यांनी बेमालूम वक्तव्य केल्याने, अखेर त्यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली असून, पुढील कारवाईसाठी महाड न्यायालयामध्ये नेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा न्यायलयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने तातडीने निकाल देण्यास असमर्थता दर्शविल्याने आत्ता महाड न्यायालयामध्ये पुढील प्रक्रियेसाठी हजार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे महाराष्ट्राचे वातावरण तापलं असून शिवसेनेने राज्यभर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. अनेक पक्षाच्या नेत्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. पाहूया कोण काय काय म्हणाले?

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, नारायण राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही,  पण आम्ही राणे साहेबांच्या मागे संपूर्ण भाजप पक्ष भक्कमपणे उभे आहोत.

काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांनीही राणेंवर टीकांची झोड उठवली आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे कि, राणे प्रकरणांवर मी महत्व देत नाही. असे म्हटले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे कि, व्यक्तिगत द्वेषातून नारायण राणे यांनी हे केलेले वक्तव्य आहे,  केंद्रीय मंत्र्यांनी खालच्या पातळीला कितपत जाऊन बोलावे याचेच हे उदाहरण आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे कि, अशा प्रकारे केंद्रीय मंत्र्यांनी वक्तव्य करणे हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे कि, अशा प्रकारची आक्षेपार्ह भाषा मुख्यमंत्र्याविषयी अथवा एखाद्या संविधानिक पदाविषयी वापरणे हि महाराष्ट्राची संस्कृती नसून बाळासाहेब जे बोलायचे ते महाराष्ट्राची संस्कृती जपून बोलायचे.

त्यामुळे नारायण राणेंच्या अशा वक्तव्याचे असे हिंसक पडसाद सर्वत्र उमटलेले पहायला मिळाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular