27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunघरात घुसून बिबट्याचा हल्ला, जखमी सुखरूप

घरात घुसून बिबट्याचा हल्ला, जखमी सुखरूप

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हिंस्र जनावरांचे मानवी हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आणि मुख्य म्हणजे घरात शिरून हल्ला करण्या इतपत या वन्यपशूंची मजल गेली आहे. चिपळूण तालुक्यातील पाते पिलवली गव्हाणवाडी येथे गुरुवारी रात्री बिबट्या तुकाराम सुवरे यांच्या घरात घुसला. त्याच्या उडीचा आवाज ऐकून घरातील महिला जागी झाली. काहितरी पडले, हे पाहण्यासाठी सुनिता तुकाराम सुर्वे यांनी मजघरातली लाईट लावली. त्यांनी लाईट लावताच समोर उभा असलेला बिबट्या त्यांना दिसला. त्यांना पाहताच बिबट्याने त्यांच्यावर पंजा मारून, तो स्वयंपाक घरात घुसला.

भुकेमुळे भक्षच्या शोधात कोंबड्या खाण्यासाठी बिबट्या तुकाराम गंगाराम सुवरे यांच्या घराजवळ आला. हे घर एका बाजूने उघडे आहे. कोंबड्यांच्या शोधात बिबट्याने घरात उडी मारली. बिथरलेला बिबट्या सुनिता सुर्वेंना पंजा मारून परत पळून जाण्यासाठी स्वयंपाक घरात गेला. मात्र तिथून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग उपलब्ध नसल्याने तो परत माजघरात वरती संदुकीवर येऊन बसला.

तोपर्यंत सुनिता यांनी मुलाला उठवले, पुन्हा हालचाल झालेली जाणवताच बिबट्या तिथल्या खॉट खाली जाऊन बसला. त्या खॉटवर तुकाराम सुवरे झोपले होते. ते या सगळ्यापासून अनभिज्ञच होते. खॉट खाली बिबट्या गेल्यावर सुनिताने पतीला हळूच उठवले. परंतु, उठताना खॉट हलल्यानं घाबरलेल्या बिबट्यानं तुकाराम यांच्या डोक्यावर पंजा मरून पुन्हा स्वयंपाकघरामध्ये पळ काढला. सुनिता, तुकाराम आणि मुलगा जीव वाचवून घराबाहेर पडले.

घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी आरडाओरडा केला आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांना घडलेली घटना सांगितली.  ग्रामस्थांनी जखमी पती-पत्नीला डेरवण येथील रुग्णालयात नेले. सकाळी परिक्षेत्र वनअधिकारी आणि पोलीस आपल्या यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षकांनी घरात शोध घेतला. त्यावेळी माळ्यावर बिबट्या लपून बसला असल्याचे लक्षात आले. घराचे दोन्ही दरवाजे आणि खिडक्या उघडून बिबट्याला बाहेर कसे काढायचे? यावर चर्चा करत असतानाच बिबट्या मागील दाराने जंगलाच्या दिशेने पळून गेला. परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री किर यांनी जखमी पती-पत्नी यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular