31.7 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeSindhudurgमालवणी मुलखात गजालींन खाल्लो घोव! येतलो कोण? राणे की राऊत?

मालवणी मुलखात गजालींन खाल्लो घोव! येतलो कोण? राणे की राऊत?

जोपर्यंत निवडणुकीच्या निकालांचा दिवस येत नाही तोपर्यंत अशाच गजाली सुरु राहणार.

अवघ्या कोकणात निवडणुकीचं वातावरण ढवळून निघाले आहे. साऱ्या राज्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्गकडे लक्ष लागले आहेत. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात अटीतटीची रोमहर्षक लढत होत आहे. त्यामुळे येतलो कोण? राणे की राऊत ? याची जोरदार चर्चा जोरदार सुरु असून मालवणी मुलखात गजालींन खाल्लो घोव! अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. कोकणचा ढाण्या वाघ म्हणून त्यांच्या समर्थकांमध्ये परिचित असलेले नारायण राणे हे निवडणूक रिंगणात आहेत.

राणे यांचा मागील दोनवेळा मुंबई आणि मालवण येथील विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यावेळी कोकणी माणूस राणे यांच्या पाठीशी उभा राहून पुन्हा दिल्लीत पाठविते का? याकडे लक्ष लागले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावीत आहेत. त्यांना विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची लोक संधी देणार का? याकडे लक्ष लागले आहेत.

बाजी कोण मारणार? – सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचं पारडं जड असल्याचे बोलले जाते. त्याउलट रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचं पारडं जड असल्याची चर्चा सुरू आहे. पण इथला माणूस विरश्री म्हणजे काही तरी करून दाखवेल याचा अंदाज लावू देणार नाही. इथला मतदार दुसऱ्याच ऐकून घेईल आणि विचारांती आपलं मन जागरूक करेल. डोक्यात ठिणगी बसली की तो योग्य ते करून दाखवेल, अशी चर्चा आहे.’

भल्या भल्यांचा टिकाव लागणे कठीण – कोणाचाही मुलाहिजा न ठेवणे, कोणालाही उंचीवर न चढविणे तरीही कोणाच्याही गुणवत्तेची मनापासून कदर करणे, ही इथली खासियत. मोठ्या नेत्यांचे मोठे पण मान्य करूनही त्यांची खिल्ली उडवणारी इथली आम जनता. इथे टिकाव लागणे भल्या भल्यांना आजवर मुश्किल झाले आहे. २०१४ साली देशात प्रचंड मोदी लाट होती. विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी कणकवली मतदारसंघातील तळेरेच्या माळरानावर भव्य जाहीर सभा घेतली होती. पण इथल्या लोकांनी. म ोदींनाही जुमानले नाही. दिल्लीची परत वाट दाखविली. त्यावेळी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. हा इतिहास आहे. तरी यावेळी भाजपाच्या उमेदवाराला इथली जनता सांथ देईल का? याचीच चर्चा संपूर्ण मालवणी मुलखात गजालींच्या माध्यमातून सुरू आहेत.

मागच्या निवडणुकीची आठवण – नाक्यानाक्यावर निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे. असे बोलले जाते की, मागच्या निडणुकीत या मतदारसंघात प्रचारासाठी मुंबईचे खतरनाक भाय लोक उतरले होते. त्यावेळी म्हणे काही पुढारी घाबरले होते आणि त्यांच्या मागून फिरणारी अर्धशिक्षित तरुणांची फलटण म्हणे बिळात लपली होती. काही भाई लोकांना कणकवलीच्या एका हॉटेल मध्ये अटक झाली होती याचीच चर्चा सुरू असून त्यानिमित्ताने ही आठवण मालवणी मुलखात आजही असून गावोगावी, बाजारातील हॉटेलमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.

गजालीन खाल्लो घोव ! – इथला माणूस राजकारणाइतकाच गजालीत रंगतो. गजाली म्हणजे रिकामं टेकड्या गप्पा. आंब्या फणसाचे दिवस सुरु झाले आहेत. चाकरमानी हळुहळू गावी येऊ लागलेत. गावच्या बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. यावेळी मालवणी मुलखातल्या बाजारपेठेत राजकारणावर गजाली रंगलेल्या ऐकायला मिळत आहेत. हॉटेलातील बाकड्यावर बसून रुचकर गरम गरम भजी आणि चायचे भुरके मारीत मारीत गजाली ऐकायला मिळत आहेत. निवडणुकीत कोण जिंकणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

जोपर्यंत निवडणुकीच्या निकालांचा दिवस येत नाही तोपर्यंत अशाच गजाली सुरु राहणार आहेत आणि ऐकणाऱ्यांना वेळेचे भान राहणार नाही. गजाली रंगात आल्यामुळे महत्वाच्या कामांचा आणि घरादाराचा विसर पडू लागला आहे. पैजा लागल्या, सट्टा बाजार तेजीत  या मतदारसंघात राणे की राऊत, निवडून येणार? यावर म्हणे लाखों रुपयांच्या पैजा लागल्या आहेत. निवडणूक जशी जवळ येईल तशी मुंबईतील सट्टा बाजार जोर घेईल, अशी चर्चा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular